मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असलेल्या ‘एमएमटीसी-पॅम्प’ने सध्या सोन्याचे वाढत्या किमतीसह, एक आकर्षक आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून त्याला प्रस्थापित करू पाहणारी ‘सोना सही है’ प्रसार-मोहीम हाती घेतली आहे. म्युच्युअल फंडाच्या धर्तीवर आता सोन्यातील गुंतवणुकीबाबत आर्थिक साक्षरता वाढविण्याचा हा प्रयत्न आहे.

सोने हे गुंतवणुकीचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून सिद्ध झाले आहे. प्रत्येक भारतीय कुटुंबांत सोने-खरेदी हे प्रतिष्ठेचे मानले जाते. या व्यतिरिक्त हा एक सुलभ, पारदर्शक, सोयीस्कर गुंतवणूक पर्याय देखील आहे. ‘सोना सही है’ या नवीन मोहिमेचे उद्दिष्ट भारतीयांच्या मौल्यवान धातूंकडे पाहण्याचा आणि त्याला एक गुंतवणूक पर्याय म्हणून दृष्टिकोन बदलण्याच्या आवश्यकतेला अधोरेखित करण्याचे आहे. सोन्याला केवळ परंपरा, प्रतिष्ठा म्हणून नव्हे तर एक ‘स्मार्ट’, आधुनिक गुंतवणूक पर्याय म्हणून स्थान ही काळाची गरज बनली आहे.

बहुआयामी मोहिमेअंतर्गत एमएमटीसी-पॅम्पच्या ‘सोने की चिडिया’ गोल्ड बार, लोटस गोल्ड बार आणि बनियन ट्री सिल्व्हर बार या उत्पादनांचा प्रसार देखील या निमित्ताने केला जाणार आहे. बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिला यासाठी करारबद्ध केले गेले आहे. एमएमटीसी-पॅम्पकडे भारतातील सोने आणि चांदीसाठी सर्वात मोठी बीआयएस-प्रमाणित रिफायनरी आहे.

लंडन बुलियन मार्केट असोसिएशन अर्थात एलबीएमएची मान्यता असलेल्या या एकमेव रिफायनरीची वार्षिक ३०० टन सोने आणि ६०० टन चांदीची या स्थापित क्षमता आहे. खाण भागीदारांकडून मिळणारा धातू आणि दागिने उद्योगातून मिळणारे जुने मोडलेले सोने ही तिचे मुख्य स्रोत आहेत.

एमएमटीसी-पॅम्पच्या उत्पादनांमध्ये ९९ टक्के शुद्धतेवर आणि उत्कृष्ट स्विस कारागिरीवर भर दिला आहे. पारंपारिक गुंतवणुकींपेक्षा आता स्मार्ट गुंतवणूक धोरण आवश्यक आहे. एमएमटीसी-पीएमएमपीच्या संकेतस्थळावर भौतिक सोने खरेदी करता येणार आहे. सोन्याच्या किमती चालू वर्षात जवळजवळ ५० टक्क्यांनी वधारल्या आहेत आणि भविष्यात त्या आणखी अत्युच्च पातळी गाठण्याचे अंदाज आहेत. या पार्श्वभूमीवर, पारंपारिक गुंतवणुकींपेक्षा आता स्मार्ट गुंतवणूक धोरण आवश्यक आहे. एमएमटीसी-पीएमएमपीच्या संकेतस्थळावर भौतिक सोने खरेदी करता येणार आहे.