· फंड घराणे – जे एम म्युच्युअल फंड

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

Over 150000 Complaints , Online Pornography, national cyber crime portal, 3 Years, 150 Cases fir Registere, police, rti data, crime news, Pornography news, Pornography in india, Porn sites, Porn share, mumbai, pune, maharashtra, west bangal,
अश्लील चित्रफितींबाबत तीन वर्षांत दीड लाखांवर तक्रारी
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
The price of gold reached the highest level
विश्लेषण: सोन्याला तेजीची झळाळी का?
The Reserve Bank kept the repo rate steady in its monetary policy meeting for the fiscal year
कर्जदारांचा पुन्हा हिरमोड; व्याजदर कपात नाहीच! रिझर्व्ह बँकेकडून सलग सातव्या बैठकीत ‘जैसे थे’ धोरण

· फंड कधी लॉन्च झाला ? – ०१ एप्रिल १९९५ .

· एन. ए. व्ही. ( १७ जानेवारी रोजी) ग्रोथ पर्याय – १३३ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता (रोजी ) – ७३ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – सतीश रामनाथन, असित भांडारकर, गुरविंदर वासन.

फंडाची स्थिरता ( ३१ डिसेंबर २०२४ )

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर १.६०

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १२ %

· बीटा रेशो ०.८४

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षात किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षात दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

हेही वाचा : Money Mantra : NPS खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, पैसे काढण्यापूर्वी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षात फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

जे एम लार्ज कॅप फंड पुढील प्रमुख मुद्द्यांच्या आधारे आपली गुंतवणुकीची पद्धत ठरवतो.

हा फंड जरी लार्ज कॅप प्रकारात मोडत असला तरी पण फंड-मॅनेजर एकूण पोर्टफोलिओच्या २०% गुंतवणूक मिडकॅप कंपन्यांमध्ये करतात. ज्यावेळी आकर्षक गुंतवणूक संधी दिसेल त्यावेळी मिडकॅपमधील गुंतवणूक या फंडाला अजून आकर्षक परतावा देणारा फंड बनवते. परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारामध्ये जेव्हा गुंतवणूक करतात तेव्हा शेअर बाजार कशा पद्धतीने उसळतील ? याचा अंदाज घेऊन धोरणात्मक दृष्ट्या गुंतवणूक केली जाते. २००० साली आलेला डॉट कॉम चा बुडबुडा, २००७-०८ मध्ये आलेला जागतिक वित्तीय संकटाचा धोका या फंडाने यशस्वीरित्या पचवला आहे. एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यावर त्याच क्षेत्रात अनेक वर्षे गुंतवणूक कायम ठेवायची असे नाही तर संधी मिळेल तशी गुंतवणूक बदलायलाही फंड मॅनेजर मागेपुढे पाहत नाहीत. कंपन्यांचा स्वतःचा भविष्यकालीन आराखडा काय आहे ? तंत्रज्ञानात बदल होतात तसा कंपन्या आपल्या व्यवसायात बदल करतात का ? याचा अंदाज घेऊन पोर्टफोलिओ बनवला जातो.

हेही वाचा : Money Mantra : आधार क्रमांक यापुढे जन्मतारखेचा पुरावा मानला जाणार नाही, EPFO ​​ने घेतला मोठा निर्णय

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

१७ जानेवारी २०२४ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – ३१ %

· दोन वर्षे – १४.४० %

· तीन वर्षे – १९.४६ %

· पाच वर्षे – १६.४७ %

· दहा वर्षे – १४.९९ %

· फंड सुरु झाल्यापासून – १३.६४ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

या फंडातील एकूण गुंतवणुकीपैकी ८५ % गुंतवणूक लार्ज कॅप, ६ % मिड कॅप, ३.५ % स्मॉल कॅप मध्ये केली आहे. एनटीपीसी ६%, अल्ट्राटेक ५.८७% , बँक ऑफ बडोदा ५.७७ %, स्टेट बँक ५.७३ %, एचडीएफसी बँक ५.६९ %, लार्सन ५.५२%, इन्फोसिस, टाटा मोटर्स, टाटा स्टील ४ % हे आघाडीचे दहा शेअर्स आहेत.

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे ?

एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक २७ % गुंतवणूक वित्तीय सेवा क्षेत्रात, वाहन उद्योग १० %, बांधकाम ९ %, माहिती तंत्रज्ञान ९ %, ऊर्जा निर्मिती ८.५ % अशी गुंतवणूक केली गेली आहे व अन्य क्षेत्रात पोर्टफोलिओची ३५ % गुंतवणूक आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ४९.१६ %

· दोन वर्षे २९.४९ %

· तीन वर्षे २२.९२ %

· पाच वर्षे २०.५ %

· सलग दहा वर्ष १४.८१ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

हेही वाचा : Money Mantra: शैक्षणिक कर्जाच्या व्याजावर किती वजावट मिळते?

  • नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षाच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.