सलील उरुणकर

किराणा दुकानात किंवा रस्त्यावरील भाजीविक्रेत्याकडे ‘युपीआय’द्वारे पेमेंट केल्यावर एका छोट्या स्पिकरमधून ती रक्कम जमा झाल्याचा आवाज येतो.. आॅनलाईन पेमेंटमुळे ग्राहकांची सोय झाली होती, पण गर्दीच्या वेळी दुकानदारांना प्रत्येक छोट्या-मोठ्या पेमेंटची खातरजमा करण्यासाठी वेळ पुरत नसे. आॅडिओ बाॅक्सद्वारे ही समस्या सुटली आणि फसवणुकीची शक्यताही टळली.

cold water sold in the name of mineral water
मिनरल वॉटरच्या नावाखाली थंड पाण्याची विक्री ! शासकीय यंत्रणा ढिम्म
rbi kotak mahindra bank marathi news, kotak bank latest marathi news
विश्लेषण: रिझर्व्ह बँकेची कोटक महिंद्र बँकेवर कारवाई काय? त्याचा बँक ग्राहकांवर काय परिणाम होणार?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच

आणखी एक उदाहरण द्यायचे झाले तर खूप वर्षांपूर्वी ग्रॅमोफोन किंवा रेकाॅर्ड प्लेयरवरून गाणी ऐकण्याची सुविधा होती. त्यानंतर आल्या कॅसेट, सीडी आणि डिजिटल स्वरुपातील डाउनलोड होणाऱ्या फाईल्स. पण खऱ्या अर्थाने संगीत क्षेत्राला बदलून टाकले ते म्हणजे स्ट्रिमिंग अॅप्सने. सेव्ह किंवा डाउनलोड न करता, आपल्या आवड्या कलाकार, गायक, गायिका, संगीतकार किंवा अन्य निकषांवर गाण्यांची निवड किंवा यादी करण्याची सुविधा या अॅप्समध्ये आली.

ऑनलाईन पेमेंट असो किंवा गाण्यांचे अॅप्स, या आणि अशा अनेक उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे उत्पादनातील नावीन्यतेसह (इनोव्हेशन) व्यवसायाच्या नवपद्धती (डिसरप्शन) हा सध्याचा ट्रेंड आहे. समाजात, शिक्षणात, शेतीत, नोकरी-धंद्यात, व्यवसायात बदल होत आहेत हे नक्की, पण या बदलांचा वेग थक्क करणारा आहे. त्यामुळेच, अशा वेगाने बदलणाऱ्या आणि अनिश्चिततेच्या काळात नावीन्यपूर्ण उत्पादन किंवा सेवा आणि त्याकरिता व्यावसायिक नवपद्धती विकसित करण्यासाठीचे कौशल्य याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे.

उत्पादन किंवा सेवा ही नावीन्यपूर्ण आहे या एका निकषावर ती डिसरप्टीव्ह म्हणजे त्यात व्यवसायपद्धत बदलण्याची क्षमता असेल असं नाही. आपल्या उदाहरणाचा विचार करायचा झाला तर सीडी हे नावीन्यपूर्ण उत्पादन होते, पण आॅडियो स्ट्रिमिंग सर्व्हिस अॅपने म्युझिक इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यामुळेच केवळ नावीन्यपूर्ण संकल्पना असणे पुरेसे नाही, तर संबंधित क्षेत्रामध्ये अमूलाग्र सकारात्मक बदल घडवून आणण्याची आणि व्यवसायाची नवपद्धती विकसित करण्याची क्षमता असलेली संकल्पना, उत्पादन किंवा सेवा ही अधिक मोलाची!

असं म्हणतात की उद्यमशीलता किंवा आन्त्रप्रेन्यूअरशिप म्हणजे आपल्यासमोरील कोणत्याही प्रकारच्या समस्या सोडविण्यासाठी केलेला व्यावसायिक प्रयत्न. अशा समस्या सोडविताना सृजनशीलता (क्रिएटीव्हिटी) आणि नावीन्यता (इनोव्हेशन) असेल तर उत्पादन किंवा सेवा विकसित होतेच. पण केवळ तिथेच न थांबता ते उत्पादन किंवा सेवा ही अधिकाधिक लोकोपयोगी कशी ठरेल आणि व्यावसायिक यश कसे मिळेल याकडेही नवउद्योजकांनी लक्ष देणे गरजेचे असते. त्यासाठी नवउद्योजकांना लागते इनोव्हेटर आणि डिसरप्टर या दोन्ही प्रकारचे कौशल्य असलेली टीम (मनुष्यबळ). असे कुशल मनुष्यबळ ज्या प्रस्थापित किंवा नव्या कंपनीकडे असते त्या कंपन्यांनाच दीर्घकालीन व्यावासायिक यश लाभल्याचे आपल्याला दिसून येईल. त्याचे कारण म्हणजे अशा कंपन्या या नेहमी त्यांच्या ग्राहकांचा विचार करत राहतात आणि ग्राहकहिताप्रमाणे निर्णय घेतात किंवा निर्णय बदलत राहतात. अशा कंपन्यांचे नेतृत्वही चपळाईने निर्णयप्रक्रिया राबविते. बहुसंख्य बड्या कंपन्यांकडे ही चपळाई आढळत नाही आणि म्हणून नवीन किंवा छोट्या कंपन्या त्यांच्यापुढे आव्हान देत उभ्या राहतात. या नवीन किंवा छोट्या कंपन्यांना स्टार्टअप्स म्हटले जाते.

निर्णयप्रक्रिया जलदगतीने होणे, नावीन्यता आणि व्यावसायिक नवपद्धती अंमलात आणणे हे वाटते तेवढे सोपे काम नाही. त्यामुळेच स्टार्टअप्सविषयी सध्या खूप चर्चा होत असली तर त्यातील वास्तव अजून भारतीय समाजापासून तसं दूर आहे. गुंतवणूकदार, नवउद्योजक अशा सर्वांच्या दृष्टीकोनातून विचार केला तरी, स्टार्टअप यशस्वी होण्याचे प्रमाण १० टक्क्यांहून कमी आहे. स्टार्टअप्स यशस्वी होण्याची इतकी कमी शक्यता असतानाही त्याची क्रेझ वाढत आहे. बड्या कॉर्पोरेट कंपन्यांचाही त्यात फायदाच आहे. प्रस्थापित कंपन्यांना एखादे नवीन उत्पादन किंवा सेवा बाजारात आणण्यासाठी लागणारा वेळ, पैसा, संसाधने, ऊर्जा ही स्टार्टअप कंपन्यांपेक्षा अधिक असते. हा खर्च आणि वेळ वाचविण्यासाठी आपापल्या क्षेत्रातील यशस्वी स्टार्टअप कंपन्यांचे अधिग्रहण (अॅक्विझिशन) करण्याकडे कॉर्पोरेट जगताचा कल असतो. आपली कंपनी दुसऱ्या कोणत्याही मोठ्या कंपनीने विकत घेणे ही पूर्वीच्या काळात तितकी प्रतिष्ठेची बाब समजली जात नसत, मात्र सध्याच्या काळात या गोष्टीभोवतीही वलय निर्माण झाले आहे. त्यामुळेच नवउद्योजकांनी नावीन्यता आणि व्यावसायिक नवपद्धती अंमलात आणून आपले स्टार्टअप यशस्वी केले तर प्रतिष्ठा, पैसा आणि प्रसिद्धी मिळेल हे नक्की!