गुंतवणूक, घराची खरेदी- विक्री, शेअर आदी सर्व व्यवहारांच्या संदर्भात आपल्याला नेहमी अनेक प्रश्न पडतात. कधी ते कर वाचविण्याच्या संदर्भात असतात तर कधी करपरताव्याच्या संदर्भात, कधी दीर्घकालीन नफ्या संदर्भात या सर्व प्रश्नांची उत्तरे दर शनिवारी मनीमंत्र सदरातील तज्ज्ञ देतील!

प्रश्न १: संयुक्त नावाने गृह कर्ज कोणाबरोबर घेता येते?

संयुक्त नावाने गृह कर्ज जवळच्या नातेवाईकाबरोबरच घेता येते. उदा: आई /वडील/पती/पत्नी/ भाऊ/बहीण/मुलगा आणि अविवाहित मुलगी यांचे बरोबरच घेता येते. या व्यतिरिक्त अन्य कोणाबरोबर संयुक्त गृह कर्ज घेता येत नाही.

प्रश्न२: संयुक्त नावाने गृह कर्ज घेण्याचा फायदा काय असतो?

दोघांचेही उत्पन्न विचारात घेतले जात असल्याने मिळणारी कर्ज रक्कम त्याप्रमाणात वाढते व आपल्याला हवे तिथे किंवा मोठे घर घेता येते. तसेच दोघांनाही करसवलतीचा फायदा घेता येऊ शकतो. याशिवाय संयुक्त कर्जदार म्हणून पहिले नाव महिलेचे असेल तर बहुतांश बँका ०.०५% इतक्या कमी दराने व्याज आकारणी केली जाते. गृह कर्ज परतफेडीचा कालावधी सामान्यत: १५ ते २५ वर्षे इतका दीर्घ असल्याने ०.०५% इतक्या कमी व्याजाने परतफेडीची रक्कम निश्चितच बऱ्यापैकी कमी होते.

उदाहरणार्थ जर रु.७५ लाख गृह कर्ज संयुक्त नावाने घेतेले व त्यात कर्जदार म्हणून पत्नीचे पहिले नाव असेल तर ९,५% ऐवजी ९.४५% दराने व्याज आकारणी केली जाईल आणि कर्ज परतफेडीचा कालावधी ४० वर्षे असेल तर इएमआय रु.६९६६५ इतका येईल अन्यथा ईएमआय रु.६९९१० इतका आला असता म्हणजे दरमहा रु.२४५ इतका कमी ईएमआय द्यावा लागेल.

प्रश्न३: संयुक्त गृह कर्जाची परतफेड कशी करावी लागते?

संयुक्त गृह कर्जाची परतफेड ही दोघांची जबाबदारी असते. प्रत्येक जण विभागून आपल्या खात्यातून कर्ज परतफेड करू शकतो किंवा संयुक्त खात्यातून इएमआय भरू शकतो. यामुळे करसवलतीचा पुरपूर लाभ घेता येतो.

प्रश्न४: संयुक्त गृह कर्ज घेण्याचे कोणत्या परिस्थितीत टाळावे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • आपल्या एकट्याच्या उत्पन्नात आवश्यक तेवढे कर्ज मिळत असेल तर
  • आपला क्रेडीट स्कोर चांगला नसेल तर
  • आपल्या सेवानिवृत्तीचा कालावधी जवळ आला असेल
  • भविष्यात दोघांमध्ये मतभेद होण्याची शक्यता वाटत असेल

वरील परिस्थितीत संयुक्त नावाने गृह कर्ज घेण्याचे टाळावे