आधार कार्ड हे भारतातील रहिवाशांच्या ओळखीचा पुरावा म्हणून काम करते. लोक त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर इत्यादी तपशील आणि बायोमेट्रिक्सद्वारे स्वेच्छेने आधार कार्डसाठी अर्ज करू शकतात. जर तुम्ही अजून तुमचा आधार अपडेट केला नसेल तर लवकरात लवकर करा आणि जर तुम्ही आधार अपडेट करण्याचा प्रयत्न केला, पण तो नाकारला गेला असेल तर काय करावे? याआधी आधार कार्डवर पत्ता पुरावा कसा अपलोड केला जातो ते जाणून घेऊ यात. आधार केंद्रावर जाऊन कागदपत्र अपडेट केले जातील. याशिवाय तुम्ही ते ऑनलाइनही करू शकता.

आधारमध्ये पत्ता पुरावा मोफत कसा अपलोड करायचा

१: https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा
2: लॉगिन करा आणि तपशील पडताळणी करा (नाव/लिंग/जन्म तारीख आणि पत्ता अद्ययावत करा)
3: अपडेट अॅड्रेसवर क्लिक करा (पुढे जाण्यासाठी संमती बॉक्सवर टिक करा) आणि नंतर ‘अपडेट आधार ऑनलाइन’वर क्लिक करा.
4: पत्त्याच्या पुराव्याची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि संमती द्या.
5: ५० रुपये भरा.
6: एक SRN निर्माण होईल. ते जतन करा.
अंतर्गत गुणवत्ता तपासणी केल्यानंतर तुम्हाला एक एसएमएस प्राप्त होणार आहे.

best time to shower morning or night what time of day should you shower heres what doctors recommend read
सकाळ की रात्र; अंघोळीची योग्य वेळ कोणती? डॉक्टर काय सांगतात? वाचा….
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
What do you do when someone is choking in front of you
तुमच्यासमोर श्वास गुदमरल्याने एखादी व्यक्ती तडफडत असेल तर तुम्ही काय कराल? डॉक्टरांनी सांगितले हे महत्वाचे उपाय
How to Remove Hair from Your Upper Lip Naturally
Dark Upper Lips: आता अप्पर लिप्स करण्यासाठी पार्लरची गरज नाही; या ४ घरगुती उपायांनी मिळवा सुटका

हेही वाचाः Money Mantra : ‘हे’ आहेत सर्वोत्तम परतावा देणारे लार्ज, मिड अन् स्मॉल कॅप फंड, टॉप ५ फंडांमध्ये किती नफा?

कागदपत्रे का नाकारली जातात?

अधिकृत वेबसाइटनुसार, आधार अपडेट विनंती वैध/योग्य कागदपत्रांद्वारे समर्थित असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावाचे वैध दस्तऐवज विनंतीसह सादर केले नसल्यास ते नाकारले जाणार आहे. नवीन अपडेट विनंती सबमिट करण्यापूर्वी खालील पायऱ्या फॉलो केल्याची खात्री करा.

आधार पत्ता अपडेट अर्ज नाकारल्यास काय करावे?

सर्वप्रथम एखाद्याने १८ वर्षांच्या वयानंतर किंवा आधार कार्ड बनवल्यानंतर १० वर्षांच्या आत बायोमेट्रिक्स अपडेट केले असल्याची खात्री करा. जर होय, तर पासपोर्ट, रेशन कार्ड किंवा बँक स्टेटमेंट (पासबुक, पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट) सारख्या वैयक्तिक कागदपत्रांसह अर्ज करण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचाः देशाला दुसरे युनिकॉर्न स्टार्टअप मिळाले, ५०० कोटी रुपयांचा निधी उभारला

ते ऑनलाइन कसे करायचे?

https://www.tndsc.co.in/downloads/2.pdf आणि खालीलपैकी कोणत्याही एकाद्वारे ते मंजूर करून घ्यावे लागेल, त्यानंतर ऑनलाइन अपडेट करता येईल.

  • संसद सदस्य
  • आमदार
  • एमएलसी
  • महानगरपालिकेचे नगरसेवक
  • तहसीलदार/राजपत्रित अधिकारी
  • मान्यताप्राप्त निवारागृहे किंवा अनाथाश्रमांचे अधीक्षक/वॉर्डन/मॅट्रॉन/संस्थांचे प्रमुख. (फक्त संबंधित शेल्टर होम किंवा अनाथाश्रमातील मुलांसाठी)
  • मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, संस्थेचे प्रमुख (केवळ संबंधित संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी), पंचायत प्रमुख/अध्यक्ष किंवा मुखिया/समतुल्य अधिकारी (ग्रामीण भागासाठी)/ग्रामपंचायत सचिव/व्हीआरओ किंवा समकक्ष (ग्रामीण भागासाठी) यांची स्वाक्षरी.