भारतात UPI च्या माध्यमातून व्यवहार करण्यास सर्वाधिक पसंती दिली जात आहे. पण आजही लोकांना अनेक कामांसाठी डिजिटल पेमेंटऐवजी रोख रक्कम लागते. अशा परिस्थितीत अनेकदा लोकांना रोख रकमेअभावी समस्यांना सामोरे जावे लागते. ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड आल्यानंतर लोक आपल्याजवळ रोख पैसे ठेवत नाहीत, त्यामुळे आपणाला एटीएममधून पैसे काढावे लागतात, पण एटीएम कार्ड नसल्यास आपल्या अडचणी आणखी वाढतात. ही समस्या संपवण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले YONO अॅप UPI शी लिंक केले आहे.

हेही वाचाः Government Jobs: ५१ हजारांहून अधिक तरुणांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

योनो अॅपच्या माध्यमातून आता क्रेडिट कार्डशिवायही एटीएममधून सहज पैसे काढता येणार आहेत. या फीचरला इंटर पेएबल कार्डलेस कॅश विथड्रॉवल (ICCW) असे म्हणतात. ही सुविधा सर्व एटीएमवर उपलब्ध आहे. बँकेने सांगितले की, या नवीन फीचरमुळे एटीएम कार्डच्या क्लोनिंगमुळे होणारी फसवणूक रोखता येणं शक्य होणार आहे. चला तर तुम्ही एटीएम कार्डशिवाय पैसे कसे काढू शकता हे जाणून घेऊ यात.

हेही वाचाः ‘पंतप्रधान मोदी रोज १४-१६ तास काम करतात;’ उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याकडून नारायण मूर्तींच्या विधानाचं समर्थन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेबिट कार्डशिवाय एटीएममधून पैसे कसे काढायचे?

सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये योनो अॅप ओपन करावे लागेल.
यानंतर तुम्हाला ‘कॅश विथड्रॉवल’ पर्याय निवडावा लागेल.
आता तुम्हाला किती रोख रक्कम काढायची आहे ते भरा.
यानंतर आता तुमचे एटीएम निवडा.
आता एक QR कोड जनरेट होईल.
तुम्हाला QR कोड स्कॅन करावा लागेल.
QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचा UPI आयडी आणि UPI पिन टाका.
UPI पिन टाकल्यानंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या खात्यातून रोख रक्कम बाहेर येईल.