लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : टाटा स्टारबक्स प्रायव्हेट लिमिटेडने वर्ष २०२८ पर्यंत देशातील एकूण दालनांची संख्या १००० वर नेण्याचे आणि दर तीन दिवसांनी नवीन दालन खुले करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. टाटा समूह आणि जागतिक कॉफी शृंखला स्टारबक्स यांच्यातील समान भागीदारीतील या संयुक्त उपक्रमाद्वारे सध्या देशभरात ३९० दालने कार्यरत आहेत. कंपनीचा आगामी विस्ताराचा भर द्वितीय व तृतीय श्रेणीत शहरांमध्ये विस्तारावर असेल.

Goldman Sachs forecasts
भारत वैश्विक ‘सेवा आगार’ बनेल ! निर्यात २०३० पर्यंत ८०० अब्ज डॉलरवर जाण्याचा गोल्डमन सॅक्सचा आशावाद
bank of maharashtra
‘महाबँके’चे ७,५०० कोटींचे निधी उभारणीचे लक्ष्य; मार्च तिमाहीत निव्वळ नफा १,२१८ कोटींवर
Vodafone Idea Announces fpo, Rs 18000 Crore, Starting from 18 april 2024, each share value 10 to 11 rs, telecom company fpo, vodafone idea telecom, finance news, finance article,
व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?

वर्ष २०३० पर्यंत ही अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल आणि स्टारबक्सच्या जागतिक पसाऱ्यात भारत ही महत्त्वाची बाजारपेठ असून येथील उपस्थिती दुपटीने वाढवण्याचे तिचे नियोजन आहे. टाटा स्टारबक्स भारतातील त्याचे कर्मचारी ८,६०० पर्यंत वाढवणार असल्याचे स्टारबक्सचे मुख्य कार्यकारी लक्ष्मण नरसिंहन यांनी सांगितले. स्टारबक्स कॉफी कंपनी आणि टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडमध्ये २०१२ मध्ये ५०:५० भागीदारीच्या माध्यमातून संयुक्त करार झाला. त्याआधारे टाटा स्टारबक्स सध्या ५४ भारतीय शहरांमध्ये ३९० हून अधिक दालने चालवते.\

हेही वाचा >>>‘पीएफसी’ला जागतिक प्रांगण खुले

गेल्या ११ वर्षांपासून भारतात उपस्थित असलेल्या कंपनीसाठी येथे अमर्याद संधी आहेत. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये कंपनीची विक्री ७१ टक्क्यांनी वाढून १,०८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ग्राहकांशी संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी भारतातील कॉफी संस्कृती विकसित करत राहू, असे टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुनील डिसोझा म्हणाले.