पीटीआय, मुंबई

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसला (यूपीआय) मोठे यश मिळाले असून, निर्माती कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) बाजारपेठेत वर्चस्व निर्माण झाले आहे, अशी टीका होत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरूवारी ही टीका फेटाळून लावली. देयक उपयोजनाच्या वाढीसाठी अद्याप खूप वाव असून, ती जगातील आघाडीची देयक प्रणाली बनू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
Bharti Hexacom initial share sale from 3rd April
भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण

यूपीआय सध्या भारतासोबत सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये कार्यान्वित झालेली आहे. यूपीआयच्या माध्यमातून होणारे मासिक व्यवहार १०० अब्जांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे तिचे बाजारपेठेत वर्चस्व निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत दास म्हणाले की, यूपीआय ही अतिशय उत्कृष्ट प्रणाली आहे. ती डिजिटल पायाभूत सुविधा बनली आहे. तिची वाढ अजूनही सुरू आहे. ती जगातील सवोत्कृष्ट प्रणाली बनली आहे. ती जगातील आघाडीची प्रणाली बनावी, अशी माझी इच्छा आहे.

हेही वाचा >>>Money Mantra: फंड विश्लेषण- टाटा लार्ज कॅप फंड

रिझर्व्ह बँकेककडून डिजिटल रुपयावर भर देत आहे. सरकारी अंशदान अथवा इतर मोबदल्यासाठी डिजिटल रुपयाचा वापर करण्याबाबत विचार सुरू आहे. आम्हाला सध्या कोणतीही घाई नाही. आम्ही आमची नवीन चलन व्यवस्था निर्माण करीत आहोत, असे दास यांनी नमूद केले.