scorecardresearch

रामदेव बाबा पुन्हा अडचणीत? ‘पतंजली’ला बसला ७००० कोटींचा फटका

मागील आठवड्यामध्ये पतंजली फूड्सचे मार्केट कॅपिटलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली आहे.

baba ramdev patanjali
बाबा रामदेव – पतंजली (लोकसत्ता ग्राफिक टीम)

योगाभ्यासासाठी प्रसिद्ध असणारे रामदेव बाबा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहेत. रामदेव बाबांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्माची तुलना करत वादग्रस्त विधान केले आहे. या प्रकरणावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण परिस्थिती बिकट असतानाच त्यांच्या पतंजली कंपनीबद्दलची माहिती समोर आली आहे.

हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टमुळे अदानी समूह अडचणीमध्ये सापडला आहे. या रिपोर्टचा परिणाम अदानी समूहाच्या शेअर्सवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांच्या खासगी संपत्तीमध्ये घट झाली आहे. शेअर मार्केटपासून ते विधान भवनामध्ये या मुद्द्यावर चर्चा होत आहेत. अदानी समूहाप्रमाणे रामदेव बाबा यांच्या पतंजली फूड्स कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या वेगाने घट होत आहे.

आणखी वाचा – योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल; मुस्लिम समाजाविषयी केलेलं ‘ते’ विधान भोवलं?

नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २४ जानेवारीपासूनच पतंजली फूड्सचे शेअर्स मार्केटमध्ये वेगाने खालावत आहेत. २४ जानेवारी रोजी या कंपनीच्या एका शेअरची किंमत १२०८ रुपये इतकी होती. पुढे ३ फेब्रुवारी रोजी त्याची घसरण होऊन शेअरची किंमत ९०७ रुपये झाली. रामदेव यांच्या कंपनीच्या शेअर्स २५ टक्यांनी घसरण झाली. त्याच दिवशी शेअर लोअर सर्किटवर पोहोचले होते. सोमवारी सकाळी शेअर मार्केट खुले झाल्यानंतर शेअर्सची किंमत काही प्रमाणामध्ये वाढली होती. आज पतंजली फूड्सची किंमत ९३६.९० इतकी आहे. २७ जानेवारीला कंपनीचे मार्केट कॅपिटल ४०,००० कोटी होते, तर ३ फेब्रुवारीला ते घसरुन ३२८२५.६९ कोटी इतके झाले होते.

आणखी वाचा – “मागच्या सात वर्षात LIC चे ५० हजार कोटी बुडाले, तरीही सरकार…”, संजय राऊत म्हणाले, “हे निर्लज्जपणाचे…”

एका आठवड्यामध्ये पतंजली फूड्सचे मार्केट कॅपिटलमध्ये घसरण होऊन कंपनीला ७००० कोटी रुपयांचे नुकसान झाले. डिसेंबर महिन्यामध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली होती. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीची मार्केट कॅपिटल ५१ हजार इतकी होती. पाच महिन्यांमध्ये पतंजली फूड्स कंपनीला १८,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 16:10 IST

संबंधित बातम्या