International Milk Day : गेल्या वर्षभरात दुधाचे दर सातत्याने वाढत आहेत. काही महिन्यांत भाव कुठच्या कुठे पोहोचले असून, ही दरवाढ थांबायचं काही नाव घेत नाहीये. गेल्या सात-आठ वर्षांत दूध जेवढे महाग झाले नव्हते, तेवढे अचानक एकाच वर्षात इतके महाग का झाले? जर आपण खोलवर अभ्यास केला तर याची अनेक कारणे असू शकतात आणि त्या सर्व कारणांमुळेच सामान्य लोकांच्या जीवनातील दुधाची चव थोडीशी बिघडली आहे. दुधाच्या किमती वाढण्यात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही परिस्थितीचा मोठा वाटा आहे.

२०२२ मध्ये दुधाच्या दरात लक्षणीय वाढ

गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने गेल्या वर्षभरात दिल्लीत अमूल फुल क्रीम दुधाची किंमत ५८ रुपयांवरून ६४ रुपयांपर्यंत वाढवली. मदर डेअरीबद्दल बोलायचे झाल्यास ५ मार्च ते २७ डिसेंबर २०२२ दरम्यान दुधाची किंमत ५७ रुपयांवरून ६६ रुपये प्रतिलिटर झाली आहे. एप्रिल २०१३ ते मे २०१४ दरम्यान दुधाच्या दरात ८ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. परंतु तेव्हापासून फेब्रुवारी २०२२ पर्यंत म्हणजे सुमारे ८ वर्षे दुधाच्या दरात प्रतिलिटर केवळ १० रुपयांनी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर फुल क्रीम दुधाच्या दरवाढ काही थांबायचं नाव घेत नव्हती. मदर डेअरीने फुल क्रीम दूध ९ रुपयांनी महाग केले, तर टोन्डची किंमत ६ रुपयांनी वाढवली, म्हणजे टोन्ड दूध ४७ रुपयांवरून थेट ५३ रुपये झाले.

Bounce Infinity e1 Electric Scooter
आनंदाची बातमी! २४ हजारांनी स्वस्त झाली जबरदस्त रेंजवाली ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर, आता फक्त ‘इतक्या’ रुपयांमध्ये आणा घरी
12th Exams, hsc, Prevent Cheating, maharashtra state education board, Filming exam process, GPS Tracking of question papers, students
बारावीची परीक्षा उद्यापासून… कॉपी रोखण्यासाठी काय तयारी?
Nigeria currency
विश्लेषणः नायजेरियाचे चलन विक्रमी पातळीवर घसरले; नेमके कारण काय?
Xiaomi Pad 6S Pro launch news
ठरलं! Xiaomi Pad 6S Pro फेब्रुवारीच्या ‘या’ तारखेला होणार लाँच; स्पेसिफिकेशन, फीचर्स जाणून घ्या…

त्याची सुरुवात कुठून झाली?

दुधाच्या दरात सातत्याने वाढ होण्यामागे अनेक कारणे आहेत. २०२० मध्ये जेव्हा कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला, तेव्हा मोठ्या प्रमाणात दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. हॉटेल, रेस्टॉरंट, कॅन्टीन, मिठाईची दुकाने बंद होती. लग्न आणि इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. त्यामुळे एप्रिल-जुलै २०२० दरम्यान दुग्धशाळांकडून गायीच्या दुधाची खरेदी किंमत १८ ते २० रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आली. त्याचबरोबर म्हशीच्या दुधाच्या दरात ३० ते ३२ रुपयांनी कपात करण्यात आली. स्किम्ड मिल्क पावडर आणि गाईचे लोणी आणि तूप यांसारख्या गोष्टींवरही त्याचा परिणाम झाला आणि सगळा धंदा बसू लागला.

गुरांचे दूध कमी कसे झाले?

याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांनी गुरांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली किंवा विस्ताराला जवळपास ब्रेक लावला. कारण लॉकडाऊनच्या काळात गुरांना चारा मिळणे कठीण झाले होते. परिणामी, त्यांचं खाद्य कमी झाले. विशेषत: वासरे आणि गायी किंवा गाभण जनावरे किंवा दूध न देणारे प्राणी सर्वाधिक दुर्लक्षित होऊ लागले.

दुधाचे दर का वाढत आहेत?

लॉकडाऊनदरम्यान मे-जून २०२१ मधील कोरोना आणि त्यानंतर झालेल्या दुर्घटनेतून ज्या गायींना जावे लागले, त्याचा परिणाम त्यांच्या दुधावर झाला आहे. कोरोनात बहुतेक शेतकऱ्यांना अंतर्गत कुपोषणामुळे फारसे दूध काढता आणि विकता आले नाही. कर्नाटक आणि तामिळनाडू सहकारी महासंघाने वार्षिक उत्पादनात १५-२०% घट नोंदवली आहे. अशा परिस्थितीमुळे देशभर दुधाची चणचण निर्माण झाली. ज्या डेअरींनी २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यास नकार दिला होता, त्याच डेअरी आज गाईच्या दुधाला प्रतिलिटर ३७-३८ रुपये आणि म्हशीच्या दुधासाठी ५४-५६ रुपये दर देत आहेत. मागणीच्या कमीमुळे दुग्धशाळांनी एप्रिल-जुलै २०२० दरम्यान गाईच्या दुधाच्या खरेदीच्या किमती (३.५% फॅट आणि ८.५% फॅट नसलेल्या दुधासह) १८-२० रुपये प्रति लिटर आणि म्हशीच्या दुधाच्या (६.५% फॅट आणि ९% फॅट नसलेल्या दुधासह) दरात कपात केली.

दुधाचे दर वाढण्याचे कारण काय?

गुरांच्या कुपोषणामुळे दुधाचे उत्पादन घटले, परंतु इतर कारणांमुळे दर वाढत आहेत. उदाहरणार्थ, २०२०-२१ मध्ये पशुखाद्य १६ ते १७ रुपये प्रति किलोवरून २०२२ च्या मध्यापर्यंत २२ ते २३ रुपये प्रति किलोपर्यंत वाढले. गूळ, मका, सोयाबीन, भुईमूग सर्वच महाग झाले. २०२१-२२ मध्ये गव्हाचे पीक खराब झाल्याने पेंढ्याचे भावही वाढले आणि अवकाळी पावसामुळे इतर चाऱ्याच्या किमतीही वाढल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत गुरांच्या दुग्धोत्पादन क्षमतेवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने त्याचे वाईट परिणाम झाले.

हेही वाचाः विश्लेषण: राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणाने काय साध्य होणार?

कोरोनानंतर अर्थव्यवस्था उघडल्यामुळे मागणीत अचानक वाढ

दुसरीकडे २०२१ च्या अखेरीपासून सरकारने अर्थव्यवस्था हळूहळू उघडण्यास सुरुवात करताच पुरवठ्याच्या तुलनेत मागणी लक्षणीय वाढली. केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मागणी वाढली, त्यामुळे पुरवठ्यावर वाईट परिणाम होऊ लागला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लोणी, तूप आणि निर्जल दुधाच्या फॅटला मोठी मागणी आहे, ज्यामुळे देशातील फुल क्रीम दुधाच्या किमतीवर मोठा ताण आला. ब्रँडेड तूप आणि बटरच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच डेअरी मालकांना दुधाच्या किमती भरमसाट वाढवल्या.

हेही वाचाः विश्लेषण: मानवी उत्क्रांतीचा नवीन सिद्धांत – कोण होते मानवाचे पूर्वज?

आता सरकार काय करू शकते?

दुधाचा तुटवडा आणि विशेषत: फॅटची कमतरता याक्षणी चिंतेची बाब आहे, बऱ्याचदा दुग्धशाळा सामान्यतः उन्हाळ्यासाठी साठा तयार करीत असतात. दुसरीकडे बटर फॅटच्या आयातीवर सध्या ४०% शुल्क आकारले जाते. पुढील हंगामापर्यंत देशांतर्गत उत्पादनात सुधारणा करण्यासाठी सरकार चाऱ्याची कमतरता भरून काढू शकते. त्यामुळे अधिकाधिक जनावरं दूध देऊन दुधाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होऊ शकते, तसेच दुधाचा साठा वाढवण्यासाठीही याचा फायदा होऊ शकतो.