सुहास पाटील
suhassitaram@yahoo.com
१) एन.एम.डी.सी. लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) BAILADILA IRON ORE MINE (BIOM), बचली काँप्लेक्स, ट्रेिनग, सेफ्टी अँड एन्व्हायरन्मेंट डिपार्टमेंट, बचली, दंतेवाडा (छत्तीसगड) – ४९४ ५५३. (अॅप्रेंटिसशिप ट्रेिनग व्हॅकेन्सी नोटिफिकेशन २०२१) NMDC Ltd., BIOM, बचली काँप्लेक्समध्ये ग्रॅज्युएट टेक्निशियन, ट्रेड अॅप्रेंटिसेसच्या एकूण ५९ पदांची अॅप्रेंटिसशिप अॅक्ट, १९६१ अंतर्गत भरती.
(१) ग्रॅज्युएट अॅप्रेंटिस – १६ पदे.
पात्रता – सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स आणि मायिनग इंजिनिअरिंग पदवी.
(४ र्वष कालावधीची)
(२) टेक्निशियन अॅप्रेंटिस – १३ पदे.
पात्रता – मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन, मायिनग, मॉडर्न ऑफिस प्रॅक्टिस मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर सायन्स अँड अॅप्लिकेशनमधील ३ र्वष कालावधीचा डिप्लोमा.
(३) प्रोग्रािमग अँड सिस्टीम्स अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट (PASAA) – ३० पदे.
पात्रता – कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅिमग असिस्टंट (COPA) ट्रेडमधील आयटीआय सर्टििफकेट.
स्टायपेंड – दरमहा रु. २०,००० / – ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसेस; रु. १६,००० / – टेक्निशियन अॅप्रेंटिसेस; रु. १०,००० / – ट्रेड अॅप्रेंटिसेस.
ट्रेड अॅप्रेंटिसेस (PASAA) उमेदवारांनी ६६६ http://www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर अॅप्रेंटिसशिप ट्रेिनगकरिता आपले नाव रजिस्टर करून अर्ज करावयाचा आहे.
ग्रॅज्युएट आणि टेक्निशियन अॅप्रेंटिसेस उमेदवारांनी ६६६ http://www.mhrdnats.gov.in या संकेतस्थळावर आपले नाव रजिस्टर करावे. उमेदवारांनी आपला Resume ज्यावर अलिकडच्या काळात काढलेले स्वत:चे पासपोर्ट आकाराचे छायाचित्र उजव्या कोपऱ्यात वर चिकटवावा, अॅप्रेंटिसशिप पोर्टलवरील रजिस्ट्रेशन नंबर, संपर्कासाठीचा पत्ता, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर लिहिलेले असावेत. सोबत जन्मतारीख, पत्ता, क्वालिफिकेशन यासाठीचे दाखले / पुरावा आणि जातीचा दाखला इ. च्या छायांकीत प्रती किंवा स्कॅण्ड् प्रती सादर कराव्यात / ई-मेल कराव्यात. पदवी / डिप्लोमा / आयटीआयच्या सर्व सेमिस्टर्सचे गुण नमूद करणे आवश्यक.
निवड पद्धती – पदवी / डिप्लोमा / आयटीआयपात्रता परीक्षेतील ट्रेड / ब्रँचनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल. (स्थानिय उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.) निवडलेल्या उमेदवारांना पोस्ट / ई-मेल / एस्एमएसद्वारे सूचित केले जाईल.
पोस्टाने आणि ई-मेलने अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे १५ जून २०२१.