रोहिणी शहा

अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भाषा विषय, सामान्य अध्ययन आणि अभियांत्रिकी तांत्रिक मुद्दे यांचा समावेश आहे. यातील तांत्रिक अभिवृत्ती घटकासाठी १०० पैकी ६० गुण ठेवण्यात आले आहेत. अभ्यासक्रम पाहिल्यास त्यामध्ये उपयोजित यंत्रशास्त्र, अभियांत्रिकी यंत्रशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी व विद्युत अभियांत्रिकी या उपघटकांचा समावेश आहे. मागील तीन वर्षांमध्ये या घटकांवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण या लेखामध्ये करण्यात येत आहे.

मागील वर्षी विचारण्यात आलेले काही प्रातिनिधिक प्रश्न पाहू.  या प्रश्नांतील योग्य उत्तरांचे पर्याय ठळक केलेले आहेत.

Que: D – Alembert’s principle states that if a rigid body is acted upon by system of forces, this system of forces may be reduced to a single resultant force whose __________ may be found out by the method of graphic statics.

  1. Magnitude
  2. Direction
  3. Line of action
  4. Magnitude, direction and line of action

 

Que: Maximum fluctuation of energy of flywheel is defined as _

  1. Sum of maximum and minimum energy
  2. Ratio of maximum and minimum energy
  3. Ratio of minimum and maximum energy
  4. Difference between maximum and minimum energy

Que: If tensile stresses in concrete are neutralized by introducing initial compressive stresses, such concrete is known as_

  1. Reinforced cement concrete
  2. Pre stressed cement concrete
  3. Fiber Reinforced cement concrete
  4. Prefabricated cement concrete

 

Que: Pick up the incorrect statement from following options.

If A is coefficient Matrix, K is Augmented Matrix and R is the Rank of Matrix

  1. If R (A) ? R (K), the statements are inconsistent and have no solutions
  2. If R (A) = R (K) = n, the statements are consistent and have unique solutions
  3. If R (A) = R (K) < n, the statements are consistent and have infinite number of solutions
  4. If R (A) = R (K) > n, the statements are consistent and have infinite number of solutions

 

Que:While measuring the power in a three phase load by two wattmeter method, the reading of the wattmeters will be equal and opposite when_

  1. The power factor is unity
  2. The load is balanced
  3. The phase angle is between 60 degree and 90 degree
  4. The load is purely inductive

Que: The thermal conductivity of _________ varies with square root of absolute temperature.

  1. solid 2. liquid
  2. gas 4. None of the above

 

Que: Two trains A and B are moving on parallel tracks in opposite direction. The velocity of A is twice that of B. They take 18 seconds to cross each other. What are the velocities of A and B? Take length of train A as 240 m and that of B as 300m,

  1. Velocity of A is 72 kmph and velocity of B is 36 kmph.
  2. Velocity of A is 80 kmph and velocity of B is 40 kmph.
  3. Velocity of A is 36 kmph and velocity of B is 18 kmph.
  4. Velocity of A is 29 kmph and velocity of B is 58 kmph.

या प्रातिनिधिक प्रश्नांच्या आधारे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यावर पुढील मुद्दे लक्षात येतात.

सर्वसाधारणपणे उपयोजित आणि अभियांत्रिकी यंत्रशास्त्र या घटकांवर प्रत्येकी १४ ते १६ प्रश्न विचारण्यात आले आहेत आणि अभियांत्रिकीच्या स्थापत्य, यांत्रिकी व विद्युत या शाखांच्या मूलभूत अभ्यासक्रमावर प्रत्येकी १० प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तयारी करताना त्या त्या घटकाला त्याच्या गुणांच्या प्रमाणात महत्त्व देणे शक्य आहे.

प्रश्नांचे स्वरूप पाहिल्यास गणिते वगळता अन्य प्रश्नांमध्ये बहुविधानी प्रश्नांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे सैद्धांतिक आणि मूलभूत अभ्यास पक्का असेल तर हे प्रश्न कमी वेळेत आणि आत्मविश्वासाने सोडविता येतात.

अभियांत्रिकी अभिवृत्तीमध्ये सैद्धांतिक आणि समीकरणे किंवा गणिते अशा दोन प्रकारचे प्रश्न दिसून येतात. यांची विभागणी करून पाहिल्यास काही मुद्दे समजून घेणे आवश्यक ठरते.

उपयोजित यंत्रशास्त्र या उपघटकामध्ये गणिते विचारण्यावरच भर असतो. किंबहुना समीकरणांच्या आधारेच या घटकाच्या तयारीचे मूल्यमापन शक्य असते. त्यामुळे या उपघटकावर एखादाच प्रश्न सैद्धांतिक असतो तर बाकीचे १४ ते १५ प्रश्न ही गणितेच असतात.

उरलेल्या चार उपघटकांचा विचार करता प्रश्नांचा भर हा सैद्धांतिक व उपयोजित मुद्दय़ांवर असलेला दिसतो. या उपघटकांवरील ४५ पैकी ३२ ते ३५ हे सैद्धांतिक व उपयोजित मुद्दय़ांवर आधारित होते. तर या दोन्ही वर्षी अभियांत्रिकीच्या चार उपघटकांवरील गणिते / समीकरणांची संख्या होती १० ते १२.

या विश्लेषणाच्या आधारे अभियांत्रिकी अभिवृत्ती या उपघटकाच्या तयारीबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.