रोहिणी शहा

भारतीय नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी, राष्ट्रीय नागरिक रजिस्टर व राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर याबाबत सध्या सुरू असलेला वाद / विवाद यांच्या अनुषंगाने चालू घडामोडींच्या संदर्भात पुढील मुद्दय़ांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात – भारतीय नागरिकत्व, ते मिळवण्याचे मार्ग, नागरिकत्वाचे प्रकार व ते संपादन करण्याचे मार्ग, स्थलांतरित, शरणार्थी, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये, तिच्याशी संबंधित कायदेशीर बाबी, राष्ट्रीय नागरिक सूची व राष्ट्रीय लोकसंख्या सूची.

indian economy marathi news
UNCTAD: भारताची अर्थव्यवस्था २०२४ मध्ये किती टक्क्यांनी वाढणार? संयुक्त राष्ट्राचा अहवाल जाहीर; व्याजदराचाही उल्लेख!
Ramtek Lok Sabha
‘भाजपच्या ‘धृतराष्ट्र’ने नैतिकतेचे वस्त्रहरण निमूट बघितले’, कोणाला उद्देशून केला आरोप जाणून घ्या…
amar kale wardha marathi news, ramdas tadas marathi news
वर्ध्यात राष्ट्रवादीच्याच दोघांमध्ये लढत ?
Changes in Joint Entrance Examination Main Exam Dates by National Examination Authority Pune news
‘जेईई मुख्य’च्या तारखांमध्ये बदल

मागील लेखामध्ये (८ व २० फेब्रुवारी) आपण काही प्रश्न पाहिले. या लेखामध्ये या मुद्दय़ांवरील काही सराव प्रश्न देण्यात आले. या लेखामध्ये राष्ट्रीय नागरिक रजिस्टर व राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर व जनगणना याबाबतचे प्रश्न पाहू.

* प्रश्न १ – भारतीय जनगणनेबाबत पुढील विधानांचा विचार करा.

अ. सन २०११ची जनगणना ही एकूण १६वी तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे.

ब. भारताची पहिली जनगणना सन १८७१मध्ये झाली.

क. सन २०२१मध्ये जनगणना डिजिटल पद्धतीने होणार आहे.

ड. जनगणना कायदा, १९४८ अन्वये भारताची जनगणना दर दहा वर्षांनी करण्यात येते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब २) ब आणि क

३) क आणि ड   ४) अ आणि क

* प्रश्न २ – भारतीय नागरिकत्व नियम २००३अन्वये भारतीय नागरिकांची राष्ट्रीय सूची (National Register of Indian citizens) मध्ये नागरिकांची पुढीलपैकी कोणती माहिती नोंदवण्याची तरतूद नाही?

अ. जन्म ठिकाण ब. सध्याचा व कायमचा पत्ता    क. धर्म ड. वैवाहिक स्थिती

इ. ठळक शारीरिक खुणा                ई. जात/पंथ

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ड   २) ब आणि ड   ३) क आणि ई   ४) अ, क आणि इ

*  प्रश्न ३ – पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने अचूक आहे/त?

अ. जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिकाऱ्याकडील जन्म नोंदणी सूची म्हणजेच राष्ट्रीय लोकसंख्या सूची होय.

ब.     ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक हा जन्म नोंदणी अधिकारी म्हणून कार्य करतो.

क.     जन्म-नोंदणी सूचीमधील नोंद दुरुस्त करता येत नाही.

ड.     जन्म आणि मृत्यू नोंदणी महानिबंधक हेच नागरिक नोंदणी महानिबंधक म्हणून कार्य करतात.

पर्यायी उत्तरे

१) अ आणि ब २) ब आणि ड   ३) क आणि ड   ४) अ आणि क

*  प्रश्न ४ –  अ. राष्ट्रीय लोकसंख्या सूची (National Population Register – NPR) म्हणजे भारतामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची सूची.

ब. भारतीय नागरिकांची राष्ट्रीय सूची (National Register of Indian Citizens – NRIC) म्हणजे सर्व भारतीय नागरिकांची सूची.

वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे?

१) अ आणि ब दोन्ही

२) अ आणि ब दोन्ही नाही

३) केवळ अ

४) केवळ ब

उत्तरे व स्पष्टीकरणे

*  प्र. क्र. १ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(३)

सन २०२१ ची जनगणना ही एकूण १६वी तर स्वातंत्र्यानंतरची आठवी जनगणना आहे. भारताची पहिली जनगणना सन १८७२ मध्ये झाली. जनगणना कायदा, १९४८ आणि जनगणना नियम १९९० अन्वये भारताची जनगणना दर दहा वर्षांनी करण्यात येते.

*   प्र. क्र. २ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(३)

भारतीय नागरिकत्व नियम २००३ अन्वये भारतीय नागरिकांची राष्ट्रीय सूची (National Register of Indian citizens) मध्ये नागरिकांची पुढील माहिती नोंदवण्याची तरतूद आहे नाव, आईचे नाव, वडीलांचे नाव, लिंग, जन्म दिनांक, जन्म ठिकाण, सध्याचा व कायमचा पत्ता, वैवाहिक स्थिती (Marital Status), विवाह झाला असल्यास जोडीदाराचे नाव, ठळक शारीरिक खुणा, नागरिकाच्या नोंदणीचा दिनांक, नोंदणीचा अनुक्रमांक, राष्ट्रीय ओळख क्रमांक (National Identification Number)

* प्र. क्र. ३ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(२)

राष्ट्रीय लोकसंख्या सूची ही नागरिकत्व नियम, २००३ अन्वये तयार करण्यात आलेली भारतात व भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय नागरिकांची यादी आहे. जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधील कलम १५अन्वये जन्म-नोंदणी सूचीमधील नोंद आवश्यकता भासल्यास बदलता येते. मात्र मूळ नोंद न खोडता तिच्या शेजारी समासामध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीने बदलाची नोंद करण्यात येते.

* प्र. क्र. ४ – योग्य उत्तराचा पर्याय क्र.(१)

राष्ट्रीय लोकसंख्या सूचीमध्ये मागील सहा महिन्यांपासून भारतात राहणाऱ्या व पुढील सहा महिने भारतात राहू इच्छिणाऱ्या सर्व लोकांचा समावेश होतो.

यामध्ये भारतीय नागरिकांसह परदेशी नागरिकांचाही समावेश होतो. तर भारतीय नागरिकांची राष्ट्रीय सूचीमध्ये भारतात व भारताबाहेर राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांचा समावेश होतो.