रोहिणी शहा

करोना विषाणूच्या प्रभावामुळे सन २०२०मध्ये प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा एक तर पुढे ढकलण्यात आल्या आहेत किंवा त्या रद्द करण्याचा विचार चालू आहे. या लेखामध्ये उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धाच्या आयोजनाशी संबंधित परीक्षोपयोगी मुद्दय़ांबाबत चर्चा करण्यात येत आहे.

टोक्यो उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा

* अधिकृत नाव  – The games of the XXXII Olympiad

* बोधचिन्ह –  बुद्धिबळ पटाच्या धर्तीवर अभिजातता आणि परिष्कृतता प्रदर्शित करणाऱ्या जांभळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या चौकडय़ांचा वापर करून बनविण्यात आले आहे.

* ब्रीदवाक्य  – United by Emotion

* अधिकृत शुभंकर (mascot) — मिराईतोवा. या जपानी शब्दरचनेचा अर्थ होतो शाश्वत भविष्यकाळ.

टोक्यो ऑलिम्पिक कालावधी  –

*  २४ जुलै ते ९ ऑगस्ट २०२० वरून पुढे ढकलून आता २३ जुलै २०२१ ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहेत.

* सहभागी राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना — एकूण २०६ राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनांपैकी १५३ राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटना मार्च २०२०पर्यंत पात्र ठरल्या होत्या.

* एकूण क्रीडा स्पर्धा — एकूण ३३ खेळांतील ५५ क्रीडा प्रकारांच्या ३३९ स्पर्धा (३३९  events in tt sports (vr disciplines)

यामध्ये एकूण १८ मुख्य ऑलिम्पिक क्रीडा प्रकार (core Olympic games) आणि पाच स्थानिक क्रीडा प्रकार समाविष्ट आहेत. पाच स्थानिक क्रीडा प्रकारांमध्ये कराटे, स्पोर्ट क्लाइम्बिंग, सर्फिग, स्केटबोर्डिग आणि बेसबॉल यांचा समावेश होतो.

स्थानिक क्रीडा प्रकार

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या नव्या धोरणानुसार आयोजक राष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेस स्पर्धामध्ये समाविष्ट करण्यासाठी नवे क्रीडाप्रकार सुचवण्याचे अधिकार आहेत. स्थानिक लोकांना या स्पर्धाकडे आकर्षित करण्यासाठी हे स्थानिक किंवा नवे क्रीडा प्रकार त्या त्या वर्षीच्या ऑलिम्पिक स्पर्धापुरते मर्यादित राहतील.

आनुषंगिक मुद्दे

सन २०२०मधील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा या आधुनिक काळातील ऑलिम्पिक स्पर्धाच्या १२४ वर्षांच्या इतिहासातील पुढे ढकलल्या गेलेल्या पहिल्या स्पर्धा असतील. यापूर्वी तीन वेळा या स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. सन १९१६ बर्लिन ऑलिम्पिक, १९४० टोक्यो ऑलिम्पिक आणि १९४४ लंडन ऑलिम्पिक या स्पर्धा अनुक्रमे पहिले विश्वयुद्ध, चीन जपान युद्ध आणि दुसरे विश्वयुद्ध या कारणांमुळे रद्द करण्यात आल्या. एखाद्या रोगाच्या साथीमुळे प्रभावित होणाऱ्या आणि पुढे ढकलल्या गेलेल्या सन २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धा  या पहिल्याच आहेत.

जपान आणि ऑलिम्पिक स्पर्धा

सन १९६४ च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करून जपान हा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारा पहिला आशियाई देश ठरला. या स्पर्धा टोक्यो येथेच आयोजित करण्यात

आल्या होत्या. या दृष्टीने टोक्यो हे ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पहिले आशियाई शहर ठरते.

सन १९७२ मध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा साप्पोरो शहरामध्ये आयोजित करण्यात आल्या. तर सन १९९८मध्ये नागानो शहरामध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

टोक्यो उन्हाळी पॅरालिम्पिक स्पर्धा

*  अधिकृत नाव – १६th Summer Paralympics

*  बोधचिन्ह – गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या चौकडय़ांचा वापर करून जपानी हातपंख्याच्या (handfan) आकारामध्ये बनविण्यात आले आहे.

*  ब्रीदवाक्य – United by Emotion

*  अधिकृत शुभंकर (mascot) — सोमेईती. खूप ताकदवान अशा अर्थाच्या so mighty या इंग्रजी शब्दांशी साधम्र्य दाखवणारे हे नाव जपानच्या चेरी ब्लॉसमच्या एका प्रकारावरून प्रेरणा घेऊन घेण्यात आले आहे.

कालावधी – २५ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२० वरून पुढे ढकलून आता २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येत आहेत.

सहभागी राष्ट्रीय पॅरालिम्पिक संघटना

एकूण ८३ राष्ट्रीय पॅरालिम्पिक संघटना मे २०२०पर्यंत पात्र ठरल्या होत्या.

* एकूण क्रीडा स्पर्धा –  एकूण २२ खेळांतील ५४० स्पर्धा

* नवीन समाविष्ट क्रीडा प्रकार  –  तायक्वांदो आणि बॅडमिंटन

आनुषंगिक मुद्दे

* अपंग खेळाडूंसाठी पॅरालिम्पिक स्पर्धा या सन १९६० पासून दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येतात.

* सन १९८८पासून पॅरालिम्पिक स्पर्धा या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजक शहरामध्येच दोन आठवडय़ांच्या कालावधीनंतर आयोजित करण्यात येतात.

* सन २०२१ मध्ये नियोजित वेळापत्रकाप्रमाणे या स्पर्धा पार पडल्यावर टोक्यो हे पॅरालिम्पिक स्पर्धा दोन वेळा आयोजित करणारे पहिले शहर ठरेल.

* रोम (इटली) मध्ये आयोजित पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये केवळ चाकाच्या खुर्चीतील खेळाडूंनाच सहभागी करून घेण्यात आले. सन १९७६पासून विविध प्रकारच्या अपंग खेळाडूंना या स्पर्धामध्ये सहभाग घेता येऊ लागला.