महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातर्फे राज्य शासनाच्या सेवेत अधिपरिचारिकांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या अधिपरिचारिका स्पर्धा परीक्षा या निवड परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

जागांची संख्या व तपशील – उपलब्ध जागांची संख्या ५२८, यापैकी ६९ जागा अनुसूचित जातीच्या, ३७ जागा अनुसूचित जमातीच्या, १६ जागा भटक्या जमातीच्या, ४२ जागा विमुक्त जमातीच्या तर १११ जागा इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव असून २५३ जागा खुल्या वर्गगटातील उमेदवारांसाठी उपलब्ध आहेत.

आवश्यक पात्रता – अर्जदारांनी महाराष्ट्र शासनाद्वारा मान्यताप्राप्त नर्सिग मिडवायफरी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला हवा व त्यांची नर्सिग कौन्सिल, मुंबईकडे नोंदणी झालेली असावी.

वयोमर्यादा – अर्जदार खुल्या वर्गगटातील असल्यास त्यांचे वय २१ फेब्रुवारी २०१८ रोजी २२ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव वर्गगटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.

निवड प्रक्रिया अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राज्य स्तरावर ३१ मार्च २०१८ रोजी घेण्यात येईल.

उमेदवारांची पदवी – पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व स्पर्धा परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यानुसार त्यांची राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत असणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये, शासकीय दंत महाविद्यालये, आरोग्य पथके, आरोग्य केंद्रे इ. मध्ये अधिपरिचारिका म्हणून नेमणूक करण्यात येईल.

वेतनश्रेणी व भत्ते – निवड झालेल्या उमेदवारांना राज्य शासनाच्या सेवेत अधिपरिचारिका म्हणून दरमहा ९३००- ३४८०० + ४२०० रुपये श्रेणी भत्ता या वेतनश्रेणीत नेमण्यात येईल.

या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना राज्य सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व फायदेही देय असतील.

अर्जाचे शुल्क – ऑनलाइन अर्जाचे शुल्क म्हणून अर्जदार ते सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी १०६० रुपये तर मागासवर्गीय उमेदवारांनी ९६० रुपये ऑनलाइन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क –  प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाची जाहिरात पाहावी अथवा संचालनालयाच्या  mahapariksha.gov.in अथवा www.dmer.org या संकेतस्थळांना भेट  द्यावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- नर्सिगविषयक पात्रताधारक उमेदवारांसाठी महाराष्ट्र स्तरावरील अधिपरिचारिका स्पर्धा परीक्षा – २०१८ फायदेशीर ठरणारी आहे. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ मार्च म्हणजे आजचीच आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्वरा करावी.