शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीही काही योजना आहेत. उच्च शिक्षणासाठी भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी थेट रक्कम वितरित करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अशा दोन योजना राज्य शासनाने सुरू केल्या आहेत. सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांपासून या योजना सुरू झाल्या आहेत. त्यांची परीक्षेपयोगी माहिती देत आहे. या दोन्ही योजनांच्या लाभाचे स्वरूप एकसारखेच आहे.
ते पुढीलप्रमाणे:
लाभाचे स्वरूप –
वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष रु. ५०००/- व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी रु. २०००/- इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरूपात देण्यात येईल.
दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांचे मूलभूत निकषही एकसारखेच आहेत.
मुलभूत पात्रता
१. विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
२. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
३. विद्यार्थ्यांने आपल्या राष्ट्रीयकृत बँकेतील खात्याशी स्वत:चा आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक आहे.
४. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थ्यांचे पालक रहिवाशी नसावेत.
५. सदर योजनेचा लाभ मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांने संबंधित शहरामध्ये राहणे आवश्यक राहील.
याव्यतिरिक्त या योजनांमध्ये वेगळ्या असलेल्या तरतुदी पुढीलप्रमाणे
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम योजना
१. प्रवर्ग – अनुसूचित जमाती
२. शासनाचा विभाग – आदिवासी विकास विभाग
३. योजनेचे स्वरूप – १२ वीनंतरच्या उच्चशिक्षणाकरिता
४. लाभाचे निकष –
शैक्षणिक निकष
१. विद्यार्थी १२ वीनंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
२. केंद्र शासनाच्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सदर योजनेंतर्गत लाभ देण्यात येईल. तथापि, दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.
३. विद्यार्थ्यांची संस्थेमधील / महाविद्यालयातील उपस्थिती ८०टक्क्यांपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
इतर निकष
१. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त ७ वष्रे सदर योजनेचा लाभ घेता येईल.
२. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
३. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा.
४. आदिम जमातीच्या व अनुसूचित जमातीच्या अपंग विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
१. प्रवर्ग – अनुसूचित जाती व नवबौद्ध
२. शासनाचा विभाग – सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग
३. योजनेचे स्वरूप – १० वीनंतरचे अभ्यासक्रम तसेच १२ वीनंतरचे व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी.
४. लाभाचे निकष –
१. ११ वीमध्ये प्रवेशासाठी १० वीमध्ये ६०% गुण तर पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी १२ वीमध्ये ६०% गुण आवश्यक.
२. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ३% आरक्षण व गुणांची अट ५०%
३. विद्यार्थ्यांची संस्थेमधील / महाविद्यालयातील उपस्थिती ७५ टक्केपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
४. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही.