*   पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्स्प्लोझिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशन, नागपूर येथे कनिष्ठ हिंदी भाषांतरकारांच्या ४ जागा-

अर्जदारांनी हिंदी वा इंग्रजीतील पदव्युत्तर पात्रता पूर्ण केलेली असावी व त्यांनी हिंदी व इंग्रजीसह पदवी उत्तीर्ण केलेली असावी अथवा त्यांनी इंग्रजी व हिंदी या आवश्यक विषयांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्स्प्लोझिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशनची जाहिरात पाहावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज पेट्रोलियम अ‍ॅण्ड एक्स्प्लोझिव्हज सेफ्टी ऑर्गनायझेशन ‘ए’ ब्लॉक, ५ वा मजला, सीजीओ कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर ४४०००६ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१७.

*  इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनतर्फे विविध प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये अधिकारी व कार्यालयीन साहाय्यकांच्या संधी-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ibps.in या संकेत स्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट.

*  नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनऊ येथे संशोधकांच्या ९ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १ ते ७ जुलै २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनऊची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.nbri.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले अर्ज कंट्रोलर ऑफ अ‍ॅडमिनिस्ट्रेशन नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, राणाप्रताप मार्ग, लखनऊ २२८००१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०१७.

*  महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूर येथे अकाऊंट्स असिस्टंटसाठी थेट मुलाखत-

अर्जदार बी.कॉम असावेत व त्यांना संगणकीय पद्धतीने अकाउंटसच्या कामाचा २ ते ३ वर्षांचा अनुभव असायला हवा.

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ, नागपूरची जाहिरात पाहावी. दूरध्वनी क्र. ०७१२- २७१२५५९ वर संपर्क साधावा

अथवा महामंडळाच्या http://www.mshcngp.org  या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य

हातमाग महामंडळ, एमएसएचसी कॉम्प्लेक्स, उमरेड मार्ग, नागपूर- ४४०००९ या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी संपर्क- ११ ऑगस्ट २०१७ रोजी दुपारी १ वाजता.

*   रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथे विधी सल्लागारांच्या ५ जागा-

अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेत स्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०१७