माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये सीनिअर इंजिनीअर्सच्या ४ जागा- अर्जदार मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.च्या http://www.mazgaondock.gov.in online Recruitment या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार येथे औद्योगिक प्रशिक्षार्थीच्या ६३ जागा- अर्जदारांनी शालान्त परीक्षा किमान ५०% गुणांसह व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पात्रता परीक्षा कमीतकमी ६५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. वयोमर्यादा २१ वर्षे. अर्जाचा नमुना व प्रशिक्षणासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवारची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक त्या तपशिलासह असणारे अर्ज प्रभारी अधिकारी, डॉकयार्ड प्रशिक्षार्थी शाळा, नौदल जहाज दुरुस्ती यार्ड, पो. नौदल तळ, कारवार- कर्नाटक ५८१३०८ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., मुंबई येथे संशोधन विभागात २ जागा : उमेदवार केमिकल इंजिनीअरिंगमधील पदवीधर वा पदव्युत्तर पात्रताधारक असावेत व त्यांना संबंधित विषयातील संशोधनपर कामाचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३३ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या ४ ते १० जून २०१६ च्या अंकातील एचपीसीएलची जाहिरात पाहावी अथवा कंपनीच्या http://www.hindustanpetroleum.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयात सीनिअर फिल्ड ऑफिसरच्या ८ जागा- उमेदवार इलेक्ट्रॉनिक्स वा टेलिकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवीधर असावेत. वयोमर्यादा ३५ वर्षे.
अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २३ ते २९ एप्रिल २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी.
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज साध्या टपालाने पोस्ट बॅग नं. ००१, लोधी रोड, हेड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
सैन्यदलात बारावी उत्तीर्णासाठी ९० जागा– उमेदवारांनी बारावीची परीक्षा गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय घेऊन व कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी आणि ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा १९.५ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१ ते २७ मे २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्यदलाची जाहिरात पाहावी अथवा http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
बँक नोट पेपर मिल, म्हैसूर येथे प्रशिक्षार्थी इंजिनीअर्ससाठी ३० जागा- अर्जदारांनी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रम्निक्स अ‍ॅण्ड टेलीकम्युनिकेशन, इन्स्ट्रमेंटेशन अ‍ॅण्ड कंट्रोल इंजिनीअरिंग अथवा केमिकल इंजिनीअरिंग किंवा पेपर अ‍ॅण्ड पल्प टेक्नॉलॉजीमधील पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० जून २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली बँक नोट पेपर मिल, म्हैसूरची जाहिरात पाहावी. अथवा http://www.bnpmindia.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
भारतीय वायुसेनेत इंजिनीअर्ससाठी संधी- उमेदवारांनी बारावीची परीक्षा गणित व भौतिकशास्त्र हे विषय घेऊन व त्यानंतर इंजिनीअरिंगची पदवी कमीतकमी ६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा २४ वर्षे.
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० जून २०१६ च्या अंकातील वायुसेनेची जाहिरात पाहावी अथवा वायुसेनेच्या http://www.careerairforce.nic.in > CANDIDATE LOGIN या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
करन्सी नोट प्रेस, नाशिकरोड येथे सुपरवायझर (रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हल्पमेंट) च्या १६ जागा- उमेदवारांनी इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, केमिकल, मेटॅलर्जी वा पल्प अ‍ॅण्ड पेपर विषयातील पदविका प्रथमश्रेणीसह उत्तीर्ण केलेली असावी. वरील विषयातील इंजिनीअरिंगमधील पदवी अथवा बीएस्सी पदवी प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण करणाऱ्यांना प्राधान्य. वयोमर्यादा ३० वर्षे.
अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० जून २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा http://cnpnashik.spmcil.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०१६.
भारतीय अजैविक स्ट्रेस प्रबंधन संस्था, बारामती येथे ज्युनिअर रिसर्च फेलोच्या २ जागांसाठी थेट मुलाखत- अधिक माहिती व तपशिलासाठी http://www.niam.res.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
तपशीलवार अर्ज व संबंधित कागदपत्रांवर अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ अँबियॉटिक स्ट्रेस मॅनेजमेंट मालेगाव, बारामती ४१३११५ (पुणे) यांच्याशी सकाळी १०.३० वाजता संपर्क साधण्याची तारीख ३० जून २०१६.
द. वा. आंबुलकर