भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., बंगलोर येथे सीनिअर इंजिनीअर्सच्या ४ जागा-

उमेदवारांनी मेकॅनिकल वा इलेक्ट्रिीकल इंजिनीअरिंगमधील पदवी उत्तीर्ण केलेली मागणी असावी. वयोमर्यादा ३२ वर्षे.

अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ ते ११ नोव्हेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली भारत इलेक्ट्रॉनिक्सची जाहिरात पाहावी अथवा http://www.bet-india.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ नोव्हेंबर २०१६.

डायरेक्टोरेट जनरल ऑफ क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स, पुणे येथे कनिष्ठ कारकून म्हणून संधी-

उमेदवार बारावी उत्तीर्ण व इंग्रजी टंकलेखनासाठी ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रताधारक असावेत. संगणकाचे ज्ञान आवश्यक. वयोमर्यादा २७ वर्षे.

अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०१६च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पाहावी.

विहित नमुन्यातील अर्ज दि कंट्रोलर, कंट्रोलर ऑफ क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स (मिलिटरी एक्सोव्हिजन) डीजीक्यूए, औंध रोड, पुणे ४११०२० या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०१६.

सीनिअर क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स एस्टॅब्लिशमेंट (आर्मामेंटस) मुंबई येथे कार्यालयीन कर्मचारी म्हणून संधी-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण असावेत. वयोमर्यादा २५ वर्षे.

अर्जाच्या नमुन्यासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ ते ११ नोव्हेंबर २०१६च्या अंकातली जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील अर्ज सीनिअर क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स एस्टॅब्लिशमेंट, डीजीक्यूए कॉम्प्लेक्स, लालबहादूर शास्त्री मार्ग, ‘सिप्ला’ जवळ, विक्रोळी (प.), मुंबई- ४०००८३ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१६.

नौदल गोदी मुंबई येथे ट्रेड्समनच्या ३९ जागा-

उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असायला हवेत. वयोमर्यादा २५ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ ते ११ नोव्हेंबर २०१६च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा नौदल गोदीच्या http://www.jobsuchi.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ नोव्हेंबर २०१६.