महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनीमध्ये लीगल अॅडव्हायजर म्हणून करारतत्त्वावर संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनीची जाहिरात पाहावी अथवा ‘महाडिस्कॉम’च्या www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संपूर्णपणे भरलेले तपशीलवार अर्ज जनरल मॅनेजर (एचआर- प्लॅनिंग), महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी- महाडिस्कॉम, एस्ट्रेला बॅटरीज एक्स्पांशन बिल्डिंग, तळमजला, प्लॉट नं. १, धारावी रोड, माटुंगा, मुंबई-४०००१९ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १५ मार्च २०१७.
अर्थ मंत्रालयांतर्गत आयकर विभागात असिस्टंट डायरेक्टर (सिस्टम)च्या ३९ जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.upsc.gov.in अथवा http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१७.
रिझव्र्ह बँक ऑफ इंडिया, मुंबईअंतर्गत साहाय्यक व्यवस्थापक (राजभाषा) च्या १० जागा-
अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४ ते १० मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा आरबीआयच्या www.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१७.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, पुणे अंतर्गत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांमध्ये प्रकल्पसंबंधित संधी-
अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च, पुणेची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.iisertirepati.ac.in>opportunities या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०१७.
स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाअंतर्गत भिलाई येथे ट्रेनी ऑपरेटर कम टेक्निशियनच्या ५० जागा-
वयोमर्यादा २८ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडियाची जाहिरात पाहावी अथवा ‘सेल’च्या www.sail.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०१७.
भारतीय वायुसेनेच्या बीदर येथील तळावर फायरमनच्या ९ जागा-
अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम व अग्निशमनविषयक पात्रताधारक असावेत. वयोमर्यादा २७ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली वायुसेनेची जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज एअर ऑफिसर कमांडिंग एअरफोर्स स्टेशन, बीदर- ५८५४०१ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख २२ मार्च २०१७.