’  गेल (इंडिया) लिमिटेडमध्ये एक्झीक्युटिव्ह ट्रेनिजच्या संधी-

अर्जदारांनी केमिकल, मेकॅनिकल, इंस्ट्रमेंटेशन, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी जीएटीई- २०१७ ही प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. अधिक माहिती व तपशिलासाठी गेल (इंडिया) च्या http://www.gailonline.com/final_site/CR-ApplyingGail.html या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१७

’  संरक्षण मंत्रालयांतर्गत सेंट्रल एएफव्ही डेपो, खडकी- पुणे येथे मटेरियल असिस्टंटच्या ४२ जागा- अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली सेंट्रल एएफव्ही डेपो, पुणेची जाहिरात पहावी अथवा www.indianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.संपूर्णपणे भरलेले अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१७

’  भारतीय वायुसेनेत गैरतांत्रिक विभागात संधी-

उमेदवार विज्ञान, गणित, सांख्यिकी, कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, जीवशास्त्र यांसारख्या विषयातील पदव्युत्तर पात्रता

६०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी व ते शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोगट २१ ते २६ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१ ते २७ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली जाहिरात पहावी अथवा वायुसेनेच्या www.careerairforce.nic.in > या संकेतस्थळाला भेट द्यावी.

संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१७

’  भारतीय वायुसेनेत लोहगाव- पुणे येथे कनिष्ठ कारकून म्हणून संधी-

उमेदवार १२ वी उत्तीर्ण असावेत व त्यांनी इंग्रजी टंकलेखनाची ३५ शब्द प्रतिमिनिट व हिंदी टंकलेखनाची ३० शब्द प्रतिमिनिट पात्रता पूर्ण केलेली असावी.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली भारतीय वायुसेना- लोहगाव, पुणेची जाहिरात पहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे अर्ज – कंपनी डीएससी ऑफिस, २ विंग एअर फोर्स स्टेशन, लोहगाव, पुणे- ४११०३२ या पत्त्यावर पाठविण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१७

*  एअर इंडिया चार्टर्स लिमिटेडमध्ये मुंबई येथे सीनिअर असिस्टंट फायनान्स/ कॅशियरच्या ४ जागा-

अर्जदार कुठल्याही विषयातील पदवीधर असावेत व त्यांना संबंधित कामाचा १ वर्षांचा अनुभव असायला हवा. वयोमर्यादा ३० वर्षे.

अधिक माहितीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकातील एअर इंडिया चार्टर्सची जाहिरात पहावी अथवा http://www.airindiaexpress.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ फेब्रुवारी २०१७’
इंडो- यूएस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी फोरम अंतर्गत साइंटिफिक ऑफिसर म्हणून संधी- अधिक माहिती व तपशिलासाठी इंडो- यूएस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीच्या http://www.iusstf.org  संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१७

’  भारतीय सैन्य दलात, एनसीसी पात्रताधारक विद्यार्थ्यांना विशेष संधी- अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या ७ ते १३ जानेवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली सैन्य दलाची जाहिरात पाहावी अथवा सैन्य दलाच्या http://www.joinindianarmy.nic.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ फेब्रुवारी २०१७

’  इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्स, बंगलोर येथे प्रोजेक्ट साइंटिफिक असोसिएट म्हणून संधी- अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रॉफिजिक्सची जाहिरात पहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या https://www.iiap.res.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख