महाराष्ट्र पोलीस दलाने पोलीस व नागरिक समन्वयासाठी जवळचे पोलीस स्टेशन व पोलीस दलाच्या सर्व हेल्पलाइन क्रमांकाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी ‘पोलीस मित्र महाराष्ट्र’ हे अॅप महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. गुगल प्ले स्टोअरवर जाऊन हे अॅप डाऊनलोड करता येते.
- नागरिकांनी हे अॅप डाउनलोड केल्यानंतर स्वत:ची संपूर्ण माहिती भरावी .
- रजिस्टर झाल्यानंतर पोलीस मदत मिळवा तसेच पोलीस मित्र म्हणून नोंदणी करा व ‘रिपोर्ट इनसिडेंट’ हे पर्याय स्क्रीनवर दिसू लागतात.
- पोलीस मदत मिळवा, हे बटण दाबल्यानंतर नागरिकांना स्क्रीनवर जवळचे पोलीस स्टेशन, अंतर व जाण्याचा मार्ग दिसतो.
- सर्व हेल्पलाइन क्रमांकावर थेट संभाषण करता येते किंवा कोणतीही अनुचित घटना घडत असेल तर त्याचा फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्डिग संबंधित पोलीस स्टेशनला थेट पाठविण्याची व्यवस्था केली आहे.
- रजिस्टर झालेल्या नागरिकांपैकी ज्यांना पोलीस मित्र म्हणून काम करायचे आहे, ते ऑनलाइन फॉर्म भरून पोलीस मित्र बनू शकतात.
- त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पोलिसांना मदत करू शकतात.
- पोलीस मित्र अॅपद्वारे नागरिक पोलिसांशी जोडले गेल्याने पोलिसांना त्याची मोठी मदत मिळत आहे.