देशातील १९ राज्यामध्ये आढळून आलेल्या फ्लोरोसिस रुग्णांच्या संख्येच्या आधारावर जास्त रूग्ण आढळलेल्या राज्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निश्चित झाले आहे.
फ्लोराईडचा उगम
फ्लोराईडचा प्रमुख स्त्रोत फ्लोराईड युक्त पाणी आहे, तसेच चहा, तंबाखू, सुपारी इत्यादी विविध घटकांमध्ये अल्प प्रमाणात फ्लोराईड आढळते. पिण्याच्या पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण १ ते १.५ मिलीग्रॅम/ लिटर (पी.पी.एम.) पेक्षा जास्त फ्लोराईड असल्यास अशा फ्लोराईडयुक्त पाण्याच्या सतत सेवनाने फ्लोरोसिस हा विकार होतो.
कार्यक्रम
- देशातील १९ राज्यातील २३० जिल्हे फ्लोरोसिस विकाराने बाधित असल्याचे आढळून आल्यानुसार, राज्यांची तीव्रतेनुसार अति तीव्र, तीव्र, मध्ययम व कमी प्रमाणातील फ्लोरोसिस बाधित राज्ये अशी वर्गवारी करण्यात आली आहे.
- राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने फ्लोरोसिस या विकाराची दखल घेउन विशेष व प्राधान्याने कार्यवाही करण्याचे केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाला निर्देश दिले.
उद्दीष्टे
- पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे फ्लोराईडसाठी परिक्षण व त्या पाण्याच्या स्त्रोतांवर अवलंबून असलेल्या लोकांची माहिती घेवून त्याचे संकलन.
- फ्लोरोसिस बाधित रुग्णांवर सर्वसमावेशक उपाययोजना व त्यांचे व्यवस्थापन.
- फ्लोरोसिस विकाराचा प्रतिबंध, निदान व व्यवस्थापनासाठी क्षमता बांधणी.
- वैद्यकिय अधिकारी व संबंधित आरोग्य कर्मचारी यांना फ्लोरोसिस विकार प्रतिबंध, निदान, विकारावरील उपाययोजना व रुग्णांचे पुनर्वसन यासाठी प्रशिक्षित करणे.
- जिल्हा स्तपरावरील व्यंगोपचार व पुर्नवसन यासाठी क्षमता बांधणी.
- पाणी नमुने व रूग्णांचे मुत्र नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळांमध्ये सुविधा निर्माण व विकास.
- विकाराबाबत माहिती, लोकांमध्ये जागृतीसाठी शिक्षण व विविध संवाद साधनाचा वापर करुन विकाराचे प्रतिबंधक उपाय व योजनांची माहिती देणे.
- विकारांचे वैयक्तिक पातळीवर निदान व त्यासंबंधी उपाययोजना.
- अधिक माहितीसाठी: http://arogya.maharashtra.gov.in/Site/ Form/Disease Content. aspx? CategoryDetailsID=OV5EmeUkebE=