का? कुठे? कसे?
रेशनकार्ड अथवा शिधापत्रिका म्हणजेच शिधा दुकानातून रास्त दरात धान्य व जीवनावश्यक वस्तू मिळण्याची सोय. काही वेळा ही शिधापत्रिका आपल्याकडून गहाळ होते अथवा चोरीस जाण्याचीही शक्यता असते. अशा वेळी काय करावे लागते याची माहिती खाली दिलेली आहे.
* कार्यालयात अर्ज करण्याची प्रक्रिया
शिधापत्रिका हरविल्यास अथवा चोरी झाल्यास त्याबाबतचा नमुना अर्ज शिधापत्रिका कार्यालयात उपलब्ध असतो. तो अर्ज भरून त्यावर दुकानदाराची सही व शिक्का किंवा स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्याची पावती द्यावी लागते. त्यानंतर नवीन दुय्यम शिधापत्रिका दिली जाते. तुम्हाला ७ ते १५ दिवसांत ही नवीन शिधापत्रिका मिळू शकते. यासाठी तुम्हाला काही शुल्क आकारले जाईल जे राज्यानुसार बदलते.
* ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया
शिधापत्रिकेसंदर्भात फक्त गहाळ झाल्याची नव्हे तर इतर कोणतीही तक्रार देण्यासाठी तुम्ही शिधावाटप परिमंडळ कार्यालयात जाऊ शकता. विभागानुसार मुंबई शहरात ४५ कार्यालये असून तुमच्या विभागानुसार तुम्ही कार्यालयात जाऊन तक्रार देऊ शकता. तुम्ही ऑनलाइन शिधापत्रिकाही काढू शकता. यासाठी तुम्हाला http://mahafood.gov.in/website/ english/Download.aspx ¹FF या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावरील ऑनलाइन अर्ज तुम्हाला भरावा लागेल. आवश्यक ती कागदपत्रे ‘स्कॅन’ करून जोडावी लागतील. शेवटी अर्ज ‘सबमिट’ करून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.