Central Bank SO Recruitment 2021: बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. ही भरती स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदांसाठी आहे. ज्या अंतर्गत डेटा अभियंता, अर्थशास्त्रज्ञ, आयटी, कायदा अधिकारी, सुरक्षा यासह अनेक रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

अर्जाची तारीख काय?

अर्जाची लिंक २३ नोव्हेंबर २०२१ रोजी सक्रिय करण्यात आली होती आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ डिसेंबर २०२१ आहे. परीक्षा २२ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे.

पात्रता काय?

सूचना आणि अर्ज पाहण्यासाठी centerbankofindia.co.in ला भेट द्या. शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादेबद्दल बोलायचे झाल्यास, वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे मानके निश्चित करण्यात आली आहेत. या पदांसाठी किमान २० ते कमाल ४५ वर्षे वयोगटातील तरुण अर्ज करू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पगार किती?

बँकिंग क्षेत्रातील या भरतीमध्ये तुमची निवड झाल्यास तुम्हाला आकर्षक पगार मिळेल. या पदांसाठीचे वेतन ६३,८४० रुपये ते १,००,३५० रुपये असेल. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना इतर भत्त्यांचाही लाभ दिला जाईल.

अर्ज शुल्क किती?

या पदांच्या भरतीसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे, परंतु SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे. उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

सूचना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.