DRDO Recruitment 2021: डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (DRDO) ने आयटीआय अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि ग्रॅज्यूएट अप्रेंटिस पदांच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२१ आहे. ईच्छुक आणि योग्य उमेदवार DRDO ची अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर ऑनलाइन नोटिफिकेशन वाचू शकतात आणि नंतर अर्ज करू शकतात. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत अर्ज पाठवण्याचं आवाहन करण्यात आलंय. त्यामूळे जर तुम्ही या भरतीसाठी पात्रतेच्या अटींमध्ये बसत असाल तर लवकर या पदांसाठी अर्ज करा.

अधिकृत अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे एकूण ४८ प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार. यात आयटीआय अप्रेंटिसची २८ पदे, डिप्लोमा अप्रेंटिसची १८ पदे आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिसची २ पदे आहेत. डिप्लोमा अॅप्रेंटिस पदावर भरतीसाठी उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंग/ कॉम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा केलेला असावा. तर, आयटीआय अप्रेंटिससाठी, उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रात आयटीआय प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. तसंच, पदवीधर प्रशिक्षणार्थीसाठी, गणित / सांख्यिकी / भौतिकशास्त्रात बीएससीची पदवी असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना तपासू शकतात.

निवड प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं तर, उमेदवारांची निवड या पदांच्या भरतीसाठी गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. यावर्षी कोविड -१ pandemic च्या साथीमुळे मुलाखती न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृपया लक्षात घ्या की, निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर बोलावलेल्या उमेदवारांना कोणतेही टीए/डीए दिले जाणार नाही. पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु .9000/- चे वेतन दिले जाईल. तर, डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना 8000 रुपये आणि आयटीआय अप्रेंटिस पदासाठी 7000 रुपये दरमहा वेतन मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदवीधर आणि पदविका प्रशिक्षणार्थी उमेदवारांना http://www.mhrdnats.gov.in वर नोंदणी करावी लागेल. आयटीआय प्रशिक्षणार्थी उमेदवारांना http://www.apprenticeshipindia.org वर नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर, सर्व उमेदवार विहित नमुन्यात आणि इतर आवश्यक कागदपत्रांमध्ये आपला अर्ज निर्धारित वेळेत अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात.