CUET 2022 Registration: नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच एनटीएने CUET 2022 साठी नोंदणीची अंतिम तारीख वाढवली आहे. यानुसार आता उमेदवार २२ मे २०२२ पर्यंत यासाठी अर्ज करू शकतात. यापूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ मे २०२२ होती. एनटीएने cuet.samart.ac.in या अधिकृत वेबसाइटवर या संदर्भात नोटीस देखील जारी केली आहे. या संदर्भात अधिक तपशीलांसाठी, उमेदवार जारी करण्यात आलेली नोटीस तपासू शकतात.

बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात. देशातील ४५ केंद्रीय विद्यापीठांमध्ये यूजी प्रवेशासाठी विद्यार्थी सामायिक विद्यापीठ (कॉमन युनिव्हर्सिटी) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलगू आणि उर्दू या भाषांमध्ये घेतली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज कसा करावा?

  • अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in ला भेट द्या.
  • अर्ज लिंकवर क्लिक करा.
  • स्वतःची नोंदणी करा.
  • सर्व आवश्यक माहिती भरा.
  • अर्ज फी सबमिट करा.
  • अर्ज डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत असून अर्जातील माहिती दुरुस्त करण्यासाठी अर्जदारांना २५ मे ते ३१ मे २०२२ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.