Maharashtra state board 12th exam Hall ticket: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता बारावीच्या मार्च- एप्रिल २०२२ परीक्षेचे हॉलतिकीट आजपासून अर्थात ९ फेब्रुवारी २०२२ पासून उपलब्ध होणार आहे. हॉलतिकीट दुपारी १ वाजल्यापासून उपलब्ध होईल. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२२ तर लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च २०२२ रोजी होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसं डाऊनलोड करायचं हॉलतिकीट ?

विद्यार्थांना हॉलतिकीट www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर कॉलेज लॉगइन मध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. लक्षात घ्या, प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यायची आहे.

या प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास कॉलेजांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा. हॉलतिकीट देण्यासाठी महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे.

हॉल तिकीट २०२२ डाउनलोड करण्यासाठी स्टेप्स

१. सर्वप्रथम महा एसएससी बोर्डाची वेबसाइट www.mahahsscboard.in उघडा.

२. आता अपडेट्स विभागात ‘ डाउनलोड महाराष्ट्र एचएससी हॉल तिकीट २०२२ लिंक’ वर जा.

२. त्यानंतर महा एसएससी १०वी हॉल तिकीट २०२२ किंवा महा एचएससी १२वी हॉल तिकीट २०२२ यापैकी निवडा.

३. तुमचा महा एचएससी हॉल तिकीट २०२२ पाहण्यासाठी तुमचा रोल नंबर किंवा नाव किंवा नोंदणी क्रमांक जन्मतारीखं टाकून एंटर करा.

४. त्यानंतर महाराष्ट्र बोर्ड हॉल तिकीट २०२२ डाउनलोड करा.

दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी सोमवारी म्हणजेच ३१ जानेवारी २०२२ रोजी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी केलेल्या हिंसक निदर्शनांंनतर आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षा ऑफलाइनच होतील असं स्पष्ट केलं आहे. पत्रकार परिषदेमध्ये शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांच्या मागणीप्रमाणे ऑनलाइन परीक्षा घेणं शक्य होणार नाही असं सांगितलं आहे. तसेच यामागील कारणांचा खुलासाही शिक्षण मंडळाकडून करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात तांत्रिक सुविधा उपलब्ध करुन देता येणार नसल्याचं स्पष्ट केलंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc exam hall tickets for 12th standard students will be available from today ttg
First published on: 09-02-2022 at 11:14 IST