नोकरीची संधी

नोकरीची संधी

सुहास पाटील

suhassitaram@yahoo.com

सिव्हिलियन डायरेक्ट रिक्रूटमेंट बोर्ड, CHQ, आर्मी सíव्हस कॉर्स (ASC) सेंटर (साऊथ)-२ एटीसी/ASC सेंटर (नॉर्थ)-१ एटीसी/एटीसी (भारत सरकार संरक्षण मंत्रालय), अग्राम पोस्ट, बंगलोर – ०७ मध्ये पुढील एकूण ४०० पदांची देशभरातील आर्मीच्या विविध लोकेशन्ससाठी भरती.

(I) ASC Centre North – ATC मधील रिक्त पदे – 

(१) सिव्हिल मोटर ड्रायव्हर (फक्त पुरुषांसाठी) – ११५ पदे (अजा – ३, अज – २९, इमाव – २२, ईडब्ल्यूएस् – ११, खुला – ५०) (मुंबई, पुणे, जळगाव प्रत्येकी १ पद).

पात्रता – (1) १० वी उत्तीर्ण, (2) एचएमव्ही/एलएमव्ही ड्रायव्हिंग लायसन्स, (3) किमान २ वर्षांचा मोटर व्हेहिकल चालविण्याचा अनुभव, (4) मोटर मेकॅनिझमचे ज्ञान आणि व्हेहिकलमधील किरकोळ दुरुस्ती करता येणे आवश्यक.

(२) क्लिनर (फक्त पुरुषांसाठी) – ६७ पदे (अजा – २, अज – १४, इमाव – २२, ईडब्ल्यूएस – ६, खुला – २३) (पुणे – १).

पात्रता – १० वी उत्तीर्ण आणि क्लिनरच्या कामात निष्णात असावा.

(३) कुक (फक्त पुरुषांसाठी) – १५ पदे (अज – ६, इमाव – ८, ईडब्ल्यूएस- १) (बंगलोर – ६ जागा, पुणे – २ जागा, मुंबई – १ जागा).

पात्रता – (्र) १० वी उत्तीर्ण, (्र) इंडियन कुकिंगचे ज्ञान आणि कामात निष्णात असावा, (्र्र) इष्ट पात्रता – संबंधित कामाचा एक वर्षांचा अनुभव.

(४) सिव्हिलियन कॅटिरग इन्स्ट्रक्टर (फक्त पुरुषांसाठी) – ३ पदे (अजा – १, अज – १, इमाव – १) (बंगलोर – ३ जागा).

पात्रता – (्र) १० वी उत्तीर्ण, (्र) कॅटिरगमधील डिप्लोमा किंवा सर्टििफकेट. इष्ट पात्रता – कॅटिरग इन्स्ट्रक्टरच्या कामाचा १ वर्षांचा अनुभव.

ASC Centre (South) 2 ATC मधील रिक्त पदे –

(५) लेबर (फक्त पुरुषांसाठी) – १९३ पदे (अज – ५४, इमाव – ४३, ईडब्ल्यूएस – १९, खुला – ७७) (पुणे – २ जागा, काम्पटी – १ जागा).

(६) एमटीएस (सफाईवाला) (पुरुषांना प्राधान्य) – ७ पदे (इमाव – ४, खुला – ३).

पात्रता – पद क्र. ५ व ६ साठी १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील प्रावीण्य.

उपलब्ध रिक्त पदांपकी ४% जागा दिव्यांग, १०% जागा माजी सनिक, ५% जागा गुणवान खेळाडू यांच्यासाठी राखीव.

वयोमर्यादा – (दि. ११ जुल २०२१ रोजी/ १७ सप्टेंबर २०२१ रोजी)

पद क्र. १ सिव्हिल मोटर ड्रायव्हर पदासाठी १८ ते २७ वष्रे. इतर पदांसाठी १८ ते २५ वष्रे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वष्रेपर्यंत, अजा/अज – ५ वष्रेपर्यंत, दिव्यांग – १० वष्रेपर्यंत).

निवड पद्धती – उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कौशल्य/ शारीरिक/ प्रात्यक्षिक चाचणी घेऊन केली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल. (जनरल इंटेलिजन्स अँड रिझिनग – २५ प्रश्न, जनरल अवेअरनेस – ५० प्रश्न, जनरल इंग्लिश – ५० प्रश्न, न्यूमरिकल अ‍ॅप्टिटय़ूड – २५ प्रश्न. प्रत्येक प्रश्नास १ गुण असेल. एकूण १५० गुण, वेळ २ तास. परीक्षेची तारीख पात्र उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल. परीक्षा फक्त बंगलोर केंद्रावरच घेतली जाईल.) अंतिम निवड लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार.

अर्जाचा नमुना एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. २८ ऑगस्ट २०२१ च्या अंकात पान क्र. २३ ते २६ वर दिलेल्या जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे.

अर्जाच्या लिफाफ्यावर (्र) APPLICATION FOR THE POST OF ______________ असे ठळक अक्षरांत लिहावे. अजा/ अज/ दिव्यांग/ माजी सनिक यांनी अर्जाच्या लिफाफ्याच्या डाव्या कोपऱ्यात आपली कॅटेगरी नमूद करावी.

(्र) १० वी परीक्षेतील मिळालेल्या गुणांची टक्केवारी उमेदवारांनी स्वाक्षरी करून पुढील रंगाच्या शाईमध्ये लिहावी.

(aa) Less than or equal to 50% in RED INK ____

(ab) From 51% to 60% in BLUE INK __________

(ac) above 61% in BLACK INK

गुणांची टक्केवारी लिहिताना ४८.४९% गुण असल्यास ४८% असे लिहावे व ५०.५०% गुण असल्यास ५१% असे लिहावे. अर्जाच्या लिफाफ्याचा नमुना जाहिरातीमध्ये Appendix-I मध्ये दिलेला आहे.

छायाचित्र- अर्जावर नेमून दिलेल्या जागेवर अलीकडच्या काळात काढलेला (स्वयंसाक्षांकित केलेला) पासपोर्ट आकाराचा फोटो चिकटवावा व तसेच दोन फोटो अर्जासोबत (समोरच्या बाजूस स्वयंसाक्षांकित केलेले) जोडावेत.

अर्जासोबत पुढील प्रमाणपत्रांच्या स्वयंसाक्षांकित प्रती जोडणे आवश्यक.

शैक्षणिक अर्हता; अजा/ अज/ इमाव/ ईडब्ल्यूएस/ दिव्यांग/ सनिक या कॅटेगरीसाठी असलेले दाखले; इमाव उमेदवारांसाठी अपेंडिक्स कश् मधील घोषणा इ. तसेच स्वत:चा पत्ता लिहिलेला एक लिफाफा (Self Addressed Registered Envelope) ज्यावर योग्य असे पोस्टाचे तिकीट लावावे.) जोडावा.

पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. १७ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील असे स्पीड पोस्टाने पाठवावेत.

(i) `To The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) 2 ATC Post Agram, Bangalore – 560 007.’ (ii) `To The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) 1 ATC Post Agram, Bangalore – 560 007.’

ज्या उमेदवारांनी ASC Centre – South च्या एकूण १०० पदांच्या जाहिरातीनुसार (Employment News च्या दि. १२-१८ जून २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या) अर्ज केले असतील त्यांनी पुन्हा त्याच पदांसाठी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. त्यांचे अर्ज Employment News च्या दि. २८ ऑगस्ट २०२१ च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीसाठी ग्राह्य़ धरले जातील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Job opportunities aarmy sarvice cource ssh