टा टा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, मुंबईतर्फे देशांतर्गत प्रमुख संस्थांमध्ये उपलब्ध असणाऱ्या एमएस्सी-पीएचडी या संयुक्त अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या ‘जेजीईईबीआयएलएस’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेशपात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या संस्था : वर नमूद केलेला अभ्यासक्रम उपलब्ध असणाऱ्या संस्थांचा तपशील खालीलप्रमाणे आहे-
अ‍ॅडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अ‍ॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, मुंबई.
सेंटर फॉर सेल्युलर अ‍ॅण्ड मॉलिक्युलर बायोलॉजी, हैदराबाद.
सेंटर फॉर डीएनए इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड डायग्नॉस्टिक्स, हैदराबाद.
डिपार्टमेंट ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस-टीआयएफआर, मुंबई.
इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, भोपाळ, कोलकाता, मोहाली व पुणे.
इन्स्टिटय़ूट फॉर स्टेम सेल बायोलॉजी अ‍ॅण्ड रिजनरेशन मेडिसीन, बंगळुरू.
नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर, मनेसर.
नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस, बंगळुरू.
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इम्युनॉलॉजी, नवी दिल्ली.
नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च, भुवनेश्वर.
रिजनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी, फरिदाबाद.
निवड पद्धत : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक शहरांमध्ये १४ डिसेंबर २०१४ रोजी घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे व नागपूर या शहरांचा समावेश असेल.
लेखी निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे विद्यार्थ्यांची संबंधित संस्थेतील अभ्यासक्रमासाठी निवड करण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क : अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून पुरुष उमेदवारांनी ५०० रु. (महिला उमेदवारांसाठी १०० रु.) नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या नावे असणारा व बंगळुरू येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : अभ्यासक्रमांच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी https://www.ncbs.res.in/admissions ही वेबसाइट पाहावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१४.