PNB Peon Recruitment 2022: पंजाब नॅशनल बँकेने (PNB) अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर शिपाई पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सर्व इच्छुक उमेदवार PNB शिपाई भर्ती २०२२ साठी २८ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. १० मार्चपासून या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अधिसूचनेनुसार, या प्रक्रियेद्वारे शिपाईच्या एकूण १५ रिक्त पदांची भरती केली जाईल. यामध्ये ६ पदे अनारक्षित प्रवर्गासाठी, ३ पदे OBC साठी, ३ पदे अनुसुचित जातीसाठी, अनुसुचित जमातीसाठी १ पद आणि २ पद आर्थिक दुर्बल घटकासाठी आहेत.

पंजाब नॅशनल बँकेत शिपाई पदाच्या भरतीसाठी, उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २४ वर्ष निश्चित करण्यात आलंय. सरकारी नियमांनुसार राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. याशिवाय, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवाराला इंग्रजी भाषेतील वाचन आणि लेखनाचे सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. तपशीलवार माहितीसाठी उमेदवार अधिकृत अधिसूचना पाहू शकतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व पात्र उमेदवार पंजाब नॅशनल बँक शिपाई भरती २०२२ साठी विहित नमुन्यात अर्ज करू शकतात आणि इतर आवश्यक कागदपत्रे स्पीड पोस्ट किंवा नोंदणीकृत पोस्टद्वारे डेप्युटी सर्कल हेड- सपोर्ट, एचआरडी विभाग, पंजाब नॅशनल बँक, सर्कल ऑफिस, बर्दवान, दुसरा मजला, श्री. दुर्गा मार्केट, पोलीस लाईन बाजार, जीटी रोड, बर्दवान-713103, या पत्त्यावर पाठवू शकता. या नोकरभरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट तपासून पाहा.