Job Alert: सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी इथे भरती; जाणून घ्या अधिक तपशील

अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२१ असणार आहे.

CFSL Pune Recruitment 2021
सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पुणे भरती (फोटो:dfsl.maharashtra.gov.in)

सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी पुणे अर्थात Central Forensic Science Laboratory येथे भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठीची संस्थेनेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (बॅलिस्टिक) या पदासाठी ही भरती होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२१ असणार आहे. उमेदवारांनी यासाठी ऑफलाइन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – बॅलिस्टिक (Junior Scientific Officer (Ballistics) या पदासाठी भरती होणार आहे.

पात्रता काय?

या पदासाठी उमेदवाराकडे पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे.

(हे ही वाचा: IIT Bombay मध्ये नोकरीची संधी,अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर )

वयोमर्यादा किती?

वयोमर्यादा ५६ वर्षे आहे.

नोकरीचे ठिकाण काय?

नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०२१ असणार आहे.

(हे ही वाचा: UIDAI Recruitment 2021: आधार कार्ड बनवणाऱ्या संस्थेमध्ये ‘या’ पदांवर भरती, जाणून घ्या तपशील )

अर्ज इथे पाठवा

अर्ज करण्यासाठी अर्ज ‘संचालक, सीएफएसएल, फॉरेन्सिक विज्ञान सेवा संचालनालय, गृह व्यवहार मंत्रालय, भारत सरकार, गट क्र. 6, नानोली टेरफे चाकण, तळेगाव एमआयडीसी फेज I, जेसीबी कंपनी जवळ, ता. मावळ, पुणे, महाराष्ट्र – 410507’ या पत्त्यावर पाठवावा.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट पहा.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune job alert 2021 central forensic laboratory cfsl pune recruitment 2021 sarkari nokriya apply online last date 1 nov ttg