बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC Bharti 2022) अंतर्गत T. N. मेडिकल कॉलेजमधील विविध विभागांमध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून कंत्राटी पद्धतीने निवड करून अर्ज मागविण्यात येत आहेत. जाहिरातीत नमूद केलेल्या विहित अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करावा. सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पदे भरण्यासाठी एकूण १२५ जागा उपलब्ध आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२२ साठी अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करतात. इच्छुक आणि पात्र उमेदवार त्यांचे अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ६ जून २०२२ आहे.

(हे ही वाचा: Indian Bank Recruitment 2022: ३००हून अधिक जागांसाठी होणार भरती, पगार ८९ हजाराहून अधिक)

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

पद संख्या – १२५ जागा

शैक्षणिक पात्रता – MD/ MS/DNB

नोकरी ठिकाण मुंबई</p>

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – ३८ वर्षे

राखीव प्रवर्गासाठी – ४३ वर्षे

अर्ज शुल्क – ५८०/- + GST १८%

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता – डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई – ४००००८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ जून २०२२

निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – चेंबर्स ऑफ डीन, टी.एन. मेडिकल कॉलेज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अधिकृत वेबसाईट – portal.mcgm.gov.in

महत्त्वाची कागदपत्रे

  • शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र (LC)
  • जन्माचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • पॅन कार्ड झेरॉक्स
  • शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे
  • मराठी विषयासह माध्यमिक शाळा परीक्षा गुण यादी, उच्च माध्यमिक शाळा परीक्षा गुण यादी
  • MS-CIT प्रमाणपत्र
  • रोजगार पात्रता प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र
  • विवाहित महिला उमेदवारासाठी विवाह प्रमाणपत्र
  • नाव बदलाची राजपत्र प्रत