मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी विप्रोने भारतीयांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने २०२२ या आर्थिक वर्षात फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. विप्रोचा वार्षिक महसूल रन रेट १० अब्ज डॉलर्स पार केला आहे. गेल्या १२ महिन्यांत यात २.४ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

डेलापोर्टे यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये आपले पद स्वीकारले. त्यांनी कंपनीमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. सप्टेंबर २०२१ ला संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित नफा ९.६ टक्क्यांनी घसरून २,९३०.७ कोटी रुपये झाला. कंपनीचा महसूल ६.९ टक्क्यांनी वाढून २.५८ अब्ज डॉलर झाला. कंपनीने ११,४७५ नवीन कर्मचारी नियुक्त केले आहेत. कंपनीच्या अट्रिशन रेट म्हणजेच कंपनी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दर वाढले आहे आणि त्यात २०.५ टक्के वाढ झाली आहे.

(हे ही वाचा: Pune Jobs: भारती विद्यापीठ पुणे येथे नोकरीची संधी; जाणून घ्या तपशील)

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत विप्रोच्या आयटी सेवांचे उत्पन्न १९,७६० कोटी रुपये होते, जे १९,१८३ कोटी रुपये होते. कंपनीने जाहीर केलेल्या निकालांनुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीचे IT सेवा EBIT मार्जिन १७.७% होते, जे १६.९% होते. आयटी सर्व्हिसेस ईबीआयटी ३,४९२ कोटी रुपये होते, ज्याचा अंदाज ३,२४४ कोटी रुपये होता.

(हे ही वाचा: जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे ‘या’ पदासाठी होणार भरती; जाणून घ्या तपशील)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले की आम्ही सलग दुसऱ्या तिमाहीत ४.५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ केली आहे. यामुळे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दरवर्षी २८ टक्के वाढ झाली आहे. त्यांनी सांगितले की विप्रोने ८० टक्के कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवले ​​आहे. ही ब=वाढ कंपनीने केलेली ही दुसरी पगारवाढ आहे.