AIASL Recruitment 2023: एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड येथे विविध पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत जवळपास ३२३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड भरतीसाठीच्या मुलाखतीची तारीख आणि वेळ याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

एकूण रिक्त पदे – ३२३

पदाचे नाव व रिक्त पदे –

  • ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल ड्यूटी ऑफिसर – ५
  • रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/ यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – ३९
  • हँडीमन/ हँडीवूमन – २७९

शैक्षणिक पात्रता –

ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल ड्यूटी ऑफिसर : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी + हलके वाहन चालक परवाना (LMV).

रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव/ यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर : मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ प्रोडक्शन/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा मोटर व्हेईकल/ ऑटो इलेक्ट्रिकल/ एअर कंडिशनिंग/ डिझेल मेकॅनिक/ बेंच फिटर/ वेल्डर विषयात ITI/ NCVT + १ वर्ष अनुभव किंवा १० वी पास + अवजड वाहन चालक परवाना (HMV).

हँडीमन/ हँडीवूमन : १० वी पास

वयोमर्यादा –

  • खुला प्रवर्ग – १८ ते २८ वर्षे.
  • ओबीसी – ३ वर्षांची सूट
  • मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट

अर्ज फी –

  • खुला प्रवर्ग – ५०० रुपये.
  • मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही.

मुलाखतीची तारीख, वेळ व ठिकाण –

मुलाखतीचे ठिकाण – श्री जगन्नाथ सभागृह, वेंगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वेंगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२

मुलाखतीची सुरवात – १७ ऑक्टोबर २०२३ सकाळी ९ वाजल्यापासून.

मुलाखतीचा शेवट – १९ ऑक्टोबर २०२३ दुपारी १२ वाजेपर्यंत.

अधिकृत वेबसाईट – http://www.aiasl.in/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1D9vb-AYYDKxXva9ULrBIGOf3l8u7QEl1/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.