Central Railway Recruitment 2023 : मध्य रेल्वे मुंबई येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज https://cr.indianrailways.gov.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर या भरती अंतर्गत एकूण १३०३ रिक्त जागा भरण्यात येणार असल्याची माहिती सेंट्रल रेल्वे भरती मंडळ मुंबई यांनी ऑगस्ट २०२३ च्या जाहिरातीमध्ये दिली आहे.
मध्य रेल्वे भरती २०२३ –
पदाचे नाव – असिस्टंट लोको पायलट, तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता, ट्रेन मॅनेजर.
एकूण रिक्त पदे – १३०३
नोकरीचे ठिकाण – मुंबई.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.
हेही वाचा- पनवेल महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ ३७७ पदांसाठी भरती सुरु, सविस्तर माहिती जाणून घ्या
महत्वाच्या तारखा –
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – ३ ऑगस्ट २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.rrccr.com/
शैक्षणिक पात्रता –
- असिस्टंट लोको पायलट – संबंधित क्षेत्रात १० वी पास/ ITI// SSLC + कोर्स पूर्ण
- तंत्रज्ञ – १० वी पास/ संबंधित क्षेत्रात ITI/ SSLC अधिक अभ्यासक्रम पूर्ण
- कनिष्ठ अभियंता- संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
- ट्रेन मॅनेजर- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी किंवा त्याच्या समकक्ष
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – ४२ वर्षे
- ओबीसी – ४६
- SC/ST – ४७
भरती प्रक्रिया –
संगणक आधारित चाचणी (CBT).
अभियोग्यता चाचणी (लागू असेल तेथे).
कागदपत्रांची पडताळणी.
वैद्यकीय तपासणी.
अर्ज शुल्क – कोणतेही अर्ज शुल्क नाही.
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी (https://rrccr.com/rrwc/Files/ed20e3e5-13f8-4aeb-94dc-9c135a7a983a.pdf) या लिकंवरील जाहिरात अवश्य पाहा.