सुहास पाटील
एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडिया, कार्गो लॉजिस्टिक्स ॲण्ड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) मध्ये ४३६ असिस्टंट सिक्युरिटी पदांवर ३ वर्षांच्या ठरावीक मुदतीकरिता भरती. (नेमणुकीचा कालावधी वाढविला जाऊ शकतो.) (Engagement Advt. No. १०/२०२३) AAICLAS ही एअरपोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियाची १०० टक्के उपकंपनी (subsidiary) आहे.
पदाचे नाव : असिस्टंट सिक्युरिटी – ४३६ पदे (३ वर्षांच्या कराराने भरती).
पात्रता : (दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी) १२ वी किमान ६० टक्के गुणांसह (अजा/ अज उमेदवारांसाठी किमान ५५ टक्के गुण) उत्तीर्ण.
उमेदवारांना हिंदी/ इंग्रजी भाषा वाचता/ बोलता येणे आवश्यक आणि स्थानिय भाषेत संभाषणात पारंगत असावा.
वयोमर्यादा : दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी २७ वर्षेपर्यंत (वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज/ माजी सैनिक – ५ वर्षे).
निवड पद्धती : शॉर्ट लिस्टेड उमेदवारांना इंटरॲक्शन आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलाविले जाईल. शॉर्ट लिस्टेड पात्र उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडीवर कॉल लेटरद्वारे इंटरॲक्शनचे ठिकाण कळविले जाईल.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
इंटरअॅक्शनमध्ये पात्रतेसाठी किमान ५० टक्के गुण आवश्यक.
इंटरअॅक्शनमधील गुणवत्तेनुसार उमेदवारांची प्रोव्हिजनल निवड यादी अअकउछअर च्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल. ३ वर्षांच्या कराराची सुरुवात सर्व सर्टिफिकेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच होईल.
नोकरीचे ठिकाण : देशभरात कोठेही. (पुणे, इंदौर, सुरत, ग्वालियर, वडोदरा, रायपूर इ.) उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदविणे आवश्यक.
वेतन : निवडलेल्या उमेदवारांना सुरुवातीला पहिल्या वर्षी रु. २१,५००/-; दुसऱ्या वर्षी रु. २२,०००/- दरमहा एकत्रित वेतन दिले जाईल आणि ट्रेनीजना तिसऱ्या वर्षी रु. २२,५००/- कॅज्युअल लिव्ह आणि (१८ प्रिव्हिलेज लिव्ह; १२ अर्ध पगारी रजा, ९) २ प्रतिबंधित रजा (RH) मिळू शकेल.
मेडिकल इन्श्युरन्सकरिता दरवर्षी रु. १०,०००/- पर्यंतची रकमेची परतफेड केली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांची नियुक्ती ठराविक मुदतीच्या कराराने (FTC) ३ वर्षांच्या कालावधीसाठी केली जाईल. यातील १ वर्षाचा कालावधी प्रोबेशन असेल.
शंकासमाधानासाठी ई-मेल आयडी hr. recruitment@aaiclas. aero वर संपर्क साधा. हेल्पडेस्क नंबर ०११-२४६६७७१३ वर संपर्क साधा.
अर्जाचे शुल्क : खुला/ इमाव – रु. ५००/-; अजा/ अज/ महिला/ ईडब्ल्यूएस उमेदवारांना रु. १००/-. त्यांनी संबंधित दाखला सादर करणे आवश्यक.
ऑनलाइन अर्ज www. aaiclas. aero या संकेतस्थळावर १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत करावेत. Advt. No. (career-; engagement 10 of 2023 Registration -; fill in application form-; upload scanned copies of following documents-; deposit application fee)
अर्जासोबत (i) १० वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. (ii) १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रक, (iii) पदवी उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि पदवीचे गुणपत्रक, (iv) कास्ट/ कॅटेगरी सर्टिफिकेट, (v) आधारकार्ड, (vi) पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ (upto 20 KB size), (vii) Scanned Signature (max. 20 KB size).
हेही वाचा >>> नोकरीची संधी
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) Advt. No. CC/११/२०२३ dt. १७.१०.२०२३. इंजिनीअर ट्रेनी पदांची GATE-2023 स्कोअर आधारित भरती. एकूण रिक्त पदे – १८४. डिसिप्लिन निहाय रिक्त पदांचा तपशील – अधिक चिन्हानंतर दाखविलेली पदे बॅकलॉगमधील आहेत.
(१) इंजिनिअर ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – (i) पॉवरग्रिडमध्ये एकूण १२८ पदे (अजा – १५+१*, अज – ९+२*, इमाव – २६+ ४*, ईडब्ल्यूएस – १०+२*, खुला – ४०+ १९*) (६ पदे दिव्यांग कॅटेगरी LD – ३, HI – २, SLD/ MI – १ साठी राखीव).
( ii) सेंट्रल ट्रान्समिशन युटिलिटी ऑफ इंडिया (CTUIL) मधील एकूण १६ पदे (अजा – ३, अज – २, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६) (१ पद दिव्यांग कॅटेगरी HI साठी राखीव).
पात्रता : (दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी) (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टीम्स इंजिनीअरिंग/ पॉवर इंजिनीअरिंग (इलेक्ट्रिकल)) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(२) इंजिनीअर ट्रेनी (सिव्हील) – पॉवर ग्रिड – २८ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११+ ३*) (२ पदे दिव्यांग कॅटेगरी – LD – १, SLD/ MI – १ साठी राखीव).
पात्रता : (दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी) सिव्हील इंजिनीअरिंग पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(३) इंजिनीअर ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – ( i) पॉवरग्रिड – ०+२* पदे (खुला) (१ पद दिव्यांग कॅटेगरी + ASL/ SLD/ MI साठी राखीव.)
( ii) CTUIL – ४ पदे (इमाव – १, खुला – ३).
पात्रता : (दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी) बी.ई./ बी.टेक. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इलेक्ट्रिकल कम्युनिकेशन/ टेली कम्युनिकेशन) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
(४) इंजिनिअर ट्रेनी (कॉम्प्युटर सायन्स) – पॉवर ग्रिड – ६ पदे (अजा – १, खुला – ५).
पात्रता : (दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी) बी.ई./ बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर इंजिनीअरिंग/इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
सर्व पदांसाठी उमेदवार GATE-2023 संबंधित सब्जेक्ट कोड पेपर उत्तीर्ण असावा.
पदवी गुणपत्रिकेत CGPA/ OGPA/ DGPA मध्ये दर्शविलेले गुणांचे विद्यापीठाच्या नियमानुसार समतूल्य टक्केवारीमध्ये रूपांतर करणे अनिवार्य आहे.
वयोमर्यादा : (दि. १० नोव्हेंबर २०२३ रोजी) २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. १० ऑक्टोबर १९९५ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.)
वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.
निवड पद्धती : GATE-2023 परीक्षेतील संबंधित विषयातील नॉर्मलाईज्ड केलेले (१०० पैकी) गुण, वर्तनात्मक मूल्यांकन (behavioral assessment), ग्रुप डिस्कशन आणि पर्सोनल इंटरव्ह्यू यांचा समावेश असेल. GATE-2023 परीक्षेतील संबंधित विषयातील नॉर्मलाईज्ड स्कोअर (१०० पैकी) नुसार उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. त्यांना पॉवरग्रिडच्या वेबसाईटवर इंटरव्ह्यूसाठीचे कॉल लेटर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवारांना ते candidates login मधून डाऊनलोड करता येईल.
पर्सोनल इंटरव्ह्यूमध्ये पात्रतेसाठी किमान गुण खुला/ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ४० टक्के, इतर राखीव पदांसाठी ३० टक्के.
ग्रुप डिस्कशनसाठी किमान पात्रतेचे गुण नसतील.
GATE-2023 (१०० पैकी) गुणांसाठी ८५ टक्के वेटेज, ग्रुप डिस्कशनसाठी ३ टक्के आणि पर्सोनल इंटरव्ह्यूसाठी १२ टक्के वेटेज देऊन अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल.
ऑनलाइन अर्जात दिलेल्या पसंतीक्रमानुसार उमेदवारांना पॉवरग्रिड किंवा CTUIL साठी मेडिकल एक्झामिनेशननंतर नेमणूक दिली जाईल.
वेतन : एक वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान ट्रेनीजना रु. ४०,०००/- मूळ वेतनावर १२ टक्के भत्ता, IDA, HRA दिला जाईल.
ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना इंजिनिअर ए२ स्केल रु. ५०,००० – ३ टक्के – १,६०,००० IDA वर कायम केले जाईल.
रु. ५०,०००/- मूळ वेतनावर IDA, HRA (किंवा अकोमोडेशन), परफॉर्मन्स रिलेटेड अलाऊन्स आणि इतर देय भत्ते दिले जातील.
अर्जाचे शुल्क : रु. ५००/- पॉवरग्रिडच्या वेबसाईटवरील लिंकवर क्लिक करून भरावेत. (https:// www. powergrid. in/ online- payment- application fees)
ऑनलाइन अर्ज www. powergrid. in या वेबसाईटवरील लिंकवर क्लिक करून दि. १० नोव्हेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी सब्जेक्टमध्ये recruitment@powergrid. co. in with ‘ET through GATE-2023; with brief description of query’ असे नमूद करून मेल करावा.