इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS), रिजनल रूरल बँकेत (RRBs) ग्रुप-ए ‘ऑफिसर्स (स्केल-I, II आणि III)’ व ग्रुप-बी ‘ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज)’च्या देशभरातील २८ राज्यांमधील एकूण २८ RRBs, मधील एकूण १३,२१७ पदे

(Office Assistant Multipurpose – ७,९७२ पदे; Officer Scale-I – ३,९०७; Officer Scale-II – ८५४; Officer Scale-III – १९९) रिक्त पदांच्या भरतीसाठी कॉमन रिक्रूटमेंट प्रोसेस (CRP for RRBs-XIV) अंतर्गत ऑनलाइन परीक्षा घेणार आहे. महाराष्ट्र राज्यातील सहयोगी ग्रामीण बँक (१) महाराष्ट्र ग्रामीण बँक (मुख्यालय औरंगाबाद येथे आहे.)

काही राज्यांतील रिक्त पदे आणि कंसात स्थानिय भाषा यांचा तपशील –

ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) – गुजरात (गुजराती) – ३००; कर्नाटक (कन्नड) – ८००; मध्य प्रदेश (हिंदी) – ५३८.

(I) ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) – एकूण ७,९७२ पदे. १) महाराष्ट्र ग्रामीण बँक – एकूण रिक्त पदे १०० (अजा – १५, अज – ८, इमाव – २७, ईडब्ल्यूएस् – १०, खुला – ४०) (१० पदे मा.सै. साठी व ४ पदे DESM साठी राखीव).

पात्रता – ( २१ सप्टेंबर २०२५ रोजी)

(i) पदवी उत्तीर्ण (कोणतीही शाखा).

(ii) स्थानीय भाषा अवगत असणे आवश्यक (महाराष्ट्रातील RRBs साठी मराठी स्थानीय भाषा असेल.)

(iii) कॉम्प्युटर नॉलेज.

(II) ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) – एकूण ३,९०७ पदे. १) महाराष्ट्र ग्रामीण बँक – एकूण रिक्त पदे १०० (अजा – १५, अज – ८, इमाव – २७, ईडब्ल्यूएस् – १०, खुला – ४०).

पात्रता – (i) पदवी उत्तीर्ण (कोणतीही शाखा) (अॅग्रिकल्चर/हॉर्टिकल्चर/फॉरेस्ट्री/ॲनिमल हजबंडरी/वेटेरिनरी सायन्स/ॲग्रिकल्चरल इंजिनीअरिंग/पिस्किकल्चर/ॲग्रिकल्चर मार्केटिंग आणि को-ऑपरेशन/इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/मॅनेजमेंट/लॉ/इकॉनॉमिक्स/अकाऊंटन्सी पदवीधारक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.)

(ii) स्थानिय भाषा अवगत असणे आवश्यक.

(iii) कॉम्प्युटर नॉलेज.

(III) ऑफिसर स्केल-II (मॅनेजर) एकूण १,१३९ पदे.

(१) जनरल बँकींग ऑफिसर – ८५४ पदे.

(२) स्पेशालिस्ट ऑफिसर्स (मॅनेजर) – एकूण २८५ पदे.

(i) ॲग्रिकल्चर ऑफिसर – ५० पदे.

(ii) मार्केटिंग ऑफिसर – १५ पदे.

(iii) ट्रेझरी मॅनेजर – १६ पदे

(iv) चार्टर्ड अकाऊंट – ६९ पदे

पात्रता – इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट यांचेकडील सर्टिफाईड असोसिएट (CA).

(v) लॉ ऑफिसर – ४८ पदे.

पात्रता – कायदा विषयातील पदवी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित कामाचा २ वर्षांचा अनुभव.

(vi) आय्टी – ८७ पदे.

पात्रता – इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/आयटी विषयातील किंवा समतूल्य पदवी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि १ वर्षाचा अनुभव.

(IV) ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) – १९९ पदे.

वयोमर्यादा – (दि. १ सप्टेंबर २०२५ रोजी) ऑफिस असिस्टंट – १८ ते २८ वर्षे, (ऑफिसर स्केल-I – असिस्टंट मॅनेजर) – १८ ते ३० वर्षे, (ऑफिसर स्केल-II – मॅनेजर) – २१ ते ३२ वर्षे, (ऑफिसर स्केल-III – सिनियर मॅनेजर) – २१ ते ४० वर्षे. कमाल वयोमर्यादेत सूट (इमाव – ३ वर्षेपर्यंत, अजा/अज – ५ वर्षेपर्यंत, अपंग – १० वर्षेपर्यंत)(फक्त ऑफिस असिस्टंट (Multi Purpose) पदांसाठी पुनर्विवाह न केलेल्या विधवा/परित्यक्ता महिला – ३५ वर्षे (खुला/ईडब्ल्यूएस्), ३८ वर्षे – (इमाव), ४० वर्षे – (अजा/अज))

अर्जाचे शुल्क – रु. ८५०/- (अजा/अज/अपंग/ESM/DESM यांना रु. १७५/-).उमेदवार ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर पदांसाठी वेगवेगळे अर्ज करू शकतात आणि अर्जाचे शुल्क वेगवेगळे भरावे लागेल. ऑफिसर स्केल- I, स्केल- II, स्केल-III मधील फक्त एकाच पदासाठी अर्ज करता येईल.

परीक्षा पद्धती – ऑब्जेक्टिव्ह टाईप पूर्व व मुख्य परीक्षा. ऑफिस असिस्टंट पदासाठी पूर्व परीक्षा – ८० प्रश्न, ८० गुण, वेळ ४५ मिनिटे. (रिझनिंग – वेळ २५ मि. आणि न्यूमरिकल अॅबिलिटी – वेळ २० मि. प्रत्येकी ४० प्रश्न).

ऑफिसर स्केल-I पदांसाठी पूर्व परीक्षा – ८० प्रश्न, ८० गुण, वेळ ४५ मिनिटे (रिझनिंग – वेळ २५ मि. आणि क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – वेळ २५ मि. प्रत्येकी ४० प्रश्न). चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा केले जातील.

मुख्य परीक्षा – ऑफिस असिस्टंट (मल्टि पर्पज) आणि ऑफिसर स्केल-१ पदांसाठी ऑब्जेक्टिव्ह टाईप – २०० प्रश्न, २०० गुण, वेळ २ तास. (१) रिझनिंग – ४० प्रश्न, ५० गुण; (२) कॉम्प्युटर नॉलेज – ४० प्रश्न, २० गुण; (३) जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न, ४० गुण; (४) इंग्लिश किंवा हिंदी भाषा – ४० प्रश्न, ४० गुण; (५) न्यूमरिकल अॅबिलिटी (ऑफिस असिस्टंट पदासाठी) क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड (ऑफिसर स्केल-I पदासाठी) – ४० प्रश्न, ५० गुण.महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी ऑफिस असिस्टंट (मल्टिपर्पज) आणि ऑफिसर स्केल-I पदांसाठी परीक्षेचे माध्यम इंग्लिश/ हिंदी/मराठी/कोंकणी असेल.

ऑफिस असिस्टंट पदासाठी अंतिम निवड मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार केली जाईल.ऑफिसर स्केल-I पदासाठी अंतिम निवड मुख्य परीक्षा (२०० गुण) आणि इंटरव्ह्यू (१०० गुण) मधील एकत्रित गुणवत्तेवर आधारित केली जाईल.

पूर्व परीक्षेसाठी महाराष्ट्रातील केंद्र – अहिल्यानगर, अकोला, भंडारा, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रायगड.मुख्य परीक्षेसाठी केंद्र – अमरावती, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई/ठाणे/नवी मुंबई, नागपूर, नाशिक, नांदेड, पुणे, रायगड.

परीक्षापूर्व प्रशिक्षण – ऑफिस असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या काही अजा/अज/इमाव/अल्पसंख्यांक/माजी सैनिक/दिव्यांग उमेदवारांसाठी आणि ऑफिसर स्केल-I पदासाठी अर्ज करणाऱ्या अजा/अज/इमाव/अल्पसंख्यांक उमेदवारांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण नागपूर, गांधीनगर, इंदोर, रायपूर इ. केंद्रांवर आर्आर्बीच्या वतीने विनामूल्य देण्यात येईल. (उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात तसे नमूद करावे.) परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठीचे कॉल लेटर डिसेंबर २०२५/जानेवारी २०२६ पासून डाऊनलोड करता येईल.परीक्षापूर्व प्रशिक्षण जानेवारी २०२५ दरम्यान घेतले जाईल.

ऑनलाइन पूर्व परीक्षा – ऑफिस असिस्टंट/ऑफिसर स्केल-I पदासाठी नोव्हेंबर/डिसेंबर २०२५ मध्ये घेतली जाईल.ऑनलाइन मुख्य परीक्षा – डिसेंबर २०२५/जानेवारी २०२६ मध्ये घेतली जाईल.

मुलाखत – ऑफिसर्स (स्केल-I, II, III) साठी जानेवारी/फेब्रुवारी २०२६ मध्ये मुलाखती घेतल्या जातील.

ऑफिस असिस्टंट/ऑफिसर्स (स्केल-I, II, III) प्रोव्हिजनल अलॉटमेंट फेब्रुवारी/मार्च २०२६ मध्ये वितरित केले जाईल.

ऑनलाइन अर्ज http://www.ibps.in या संकेतस्थळावर दि. २१ सप्टेंबर २०२५ (२३.३० वाजे)पर्यंत करता येतील.