BECIL Recruitment 2024 : तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय आणि चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? तुम्हाला मीडियामध्ये काम करण्याची इच्छा आहे का? मग इतरत्र शोधकाम करण्यात वेळ घालवू नका. कारण ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टंट्स इंडियन लिमिटेड म्हणजेच बेसिलमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ या.

BECIL Recruitment 2024 रिक्त पदे – ही भरती मोहीम ४४ मॉनिटर पदे भरण्यासाठी आयोजित केली जाते.

big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल
loksatta analysis 30 Indians promised high paying jobs in thailand duped into scams in laos
विश्लेषण: थायलंडमध्ये नोकरीचे आश्वासन… लाओसमध्ये बेकायदा रवानगी… ३० भारतीय तरुणांची कशी झाली सुटका?
Central government decision to maintain export ban indefinitely to keep domestic onion prices under control
कांदा निर्यातबंदी कायम; दर आणखी कोसळण्याची भीती, शेतकऱ्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया
Air Force School in Pune
पुण्यातील एअरफोर्स स्कुलमध्ये विविध पदांसाठी होणार भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज, ५६०००पर्यंत मिळू शकतो पगार

BECIL Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. उमेदवारांना संबंधित भाषेचे ज्ञान असलेल्या संगणकात प्रवीणता असली पाहिजे. याव्यतिरिक्त उमेदवारांना मीडिया/वृत्त क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना नोकरीत प्राधान्य मिळणार आहे. पीजी डिप्लोमा इन जर्नालिझम/ बॅचलर इन जर्नालिझम/ मास कम्युनिकेशन.

BECIL Recruitment 2024 अर्ज शुल्क – बेसिल भरतीसाठी अर्ज करणाऱ्या जनरल, ओबीसी, माजी सैनिक आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना ८८५ रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना ५३१ रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.

BECIL Recruitment 2024 – अर्ज कसा करावा

  • http://www.becil.com या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  • मुख्यपृष्ठावर, करिअर पृष्ठावर क्लिक करा.
  • नोंदणी फॉर्मवर क्लिक करा (ऑनलाइन अर्ज करा)
  • नोंदणी करा आणि अर्ज प्रक्रियेसह पुढे जा.
  • सर्व आवश्यक माहिती (Details) अपलोड करा.
  • अर्ज फी भरा.

हेही वाचा >> BEML Recruitment 2024: भारत अर्थ मूव्हर्समध्ये भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? सविस्तर वाचा

  • संदर्भासाठी फॉर्मची एक प्रिंटआउटसुद्धा घ्या. अशा प्रकारे उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.