BMC Licence Inspecto Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशनद्वारे (BMC ) ” अनुज्ञापन निरीक्षक” पदाच्या(Licence Inspector) विविध रिक्त जागांच्या भरतीची अधिसुचना जाहीर केली आहे. अधिकृत अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. या पद भरती मोहिमेंअतर्गत एकूण ११८ रिक्त जागांवर भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा. अर्जाची प्रक्रिया २० एप्रिल २०२४ पासून सुरु होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ मे २०२४ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

BMC Licence Inspector Bharti 2024 : वयोमर्यादा
अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराचे वय ४३ वर्ष असावे. शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत सुचना काळजीपूर्वक वाचा.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
India Post Recruitment 2024
India Post Jobs 2024: इंडिया पोस्टमध्ये निघाली भरती! ६३ हजारपर्यंत मिळेल पगार, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

हेही वाचा – ICMR Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थेमध्ये विविध पदांवर होणार भरती! ‘इतक्या’ हजारांपर्यंत मिळणार पगार

BMC Licence Inspecto Recruitment 2024 : अर्ज शुल्क
या पदासाठी अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरणे अनिवार्य आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये तर मागासप्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. परीक्षा शुल्क भरण्याकरीता ऑनलाईन सुविधा (ONLINE MODE) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
सदर परीक्षा शुल्क हे ना-परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

BMC Licence Inspector Notification 2024 Salary Details : पगार
अनुज्ञापन निरीक्षक पदावर निवड झालेल्या उमेदवाराला स्तर एम १७ नुसार रु. २९२०० ते ९२,३०० रुपये (असुधारित वेतन श्रेणीनुसार ५२००- २०२००+२८०० श्रेणीवेतन) इतका पगार मिळू शकतो.

हेही वाचा- SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक

अधिसुचना – https://portal.mcgm.gov.in/irj/go/km/docs/documents/MCGM%20Department%20List/Chief%20Personnel%20Officer/Recruitment%20Notice/recruitment%20of%20inspector.pdf

BMC Licence Inspecto Recruitment 2024 : अर्ज कसा करावा?

-अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील. इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. ऑनलाइन अर्ज https://portal.mcgm.gov.in या पोर्टलवर ‘उज्ज्वल संधींसाठी – सर्व नोकरीच्या संधी’ या टॅबवर क्लिक केल्यानंतर उपलब्ध होईल.
-उमेदवाराने वर नमूद केलेल्या लिंकला भेट द्यावी आणि परिपत्रकासह संलग्न ‘‘HOW TO APPLY’’ मधील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून अर्ज सादर करावा.
-जर कोणत्याही वेळी असे आढळून आले की कर्मचारी/उमेदवार नियुक्तीसाठी विहित पात्रता आणि अटी पूर्ण करत नाही परवाना निरीक्षकाच्या पदासाठी त्याची उमेदवारी रद्द केली जाईल. त्याला त्याच्या मूळ पदावर परत आणले जाईल आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.