ICMR Recruitment 2024 : राष्ट्रीय पोषण संस्थेमध्ये सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील पदांवर भरती करण्यात येणार आहे. नेमकी ही भरती कोणत्या पदांवर आणि किती रिक्त जागांवर होईल, याची माहिती पाहा. तसेच या नोकरीसाठी पात्रता निकष आणि शैक्षणिक पात्रता काय आहे हेदेखील जाणून घ्या.

ICMR Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

राष्ट्रीय पोषण संस्थेअंतर्गत –

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
UPSC Success Story Of Uday Krishna Reddy
“शेवटी तू फक्त एक हवालदार” वरिष्ठाने केलेल्या अपमानाचा असा घेतला बदला; यूपीएससीत मारली बाजी
Ministry of Railways has Released f frequently asked questions for RPF Constable Vacancy 2024 Must Read
RPF Recruitment 2024: ‘आरपीएफ’मध्ये कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांसाठी महाभरती; अर्ज करताना खाते कसे उघडावे? पाहा डिटेल्स
Heeramandi Dark History
स्वतःच्या मुलींच्या कौमार्याचा बाजार मांडणारं हीरामंडीचं भयाण वास्तव; कलंकित इतिहास काय सांगतो?
MPSC Mantra Non Gazetted Services Joint Prelims Exam Analysis of geography questions
MPSC मंत्र: अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा; भूगोल प्रश्न विश्लेषण
WAPCOS Engineer Recruitment or Bharti For 275 Various Posts Check selection process and important details
WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदाच्या एका जागेसाठी भरती होणार आहे.
एसआरएफ [SRF] या पदासाठी एकूण एका जागेवर भरती होणार आहे.
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी एकूण दोन जागांवर भरती होणार आहे.
प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटोमिस्ट) या पदासाठी एका जागेवर भरती होणार आहे.

अशा एकूण पाच जागांवर भरती करण्यात येणार आहे.

वयोमर्यादा –

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि एसआरएफ [SRF] या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ३५ वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
तर उर्वरित, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटोमिस्ट) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ३० वर्षे अशी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा : SAI recruitment 2024: भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची संधी! मिळणार ‘इतक्या’ लाखांचा पगार…

ICMR Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस / AYUSH / BDS पदवी असणे आवश्यक आहे.

एसआरएफ [SRF] –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.SC./ M.A. / MSW पदवी असणे आवश्यक आहे.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे, अँथ्रोपॉलॉजी / सामाजिक विज्ञान/समाजशास्त्र/विज्ञान (बायोकेमिस्ट्री/ मायक्रोबायोलॉजी) क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे अथवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण असावे.

प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटोमिस्ट) –

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून MLT क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

ICMR Recruitment 2024 : वेतन

कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास ६० हजार + १५,००० (FDA) रुपये वेतन देण्यात येईल.

एसआरएफ [SRF] या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास, ४४ हजार, ४५० + १२,००० (FDA) रुपये वेतन देण्यात येईल.

वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास ३२ हजार + १२,००० (FDA) रुपये वेतन देण्यात येईल.

प्रकल्प सहाय्यक (फ्लेबोटोमिस्ट) या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्यास ३१ हजार + १२,००० (FDA) रुपये वेतन देण्यात येईल.

ICMR Recruitment 2024 – राष्ट्रीय पोषण संस्था अधिकृत वेवसाईट लिंक
https://www.nin.res.in/index.html

ICMR Recruitment 2024 – अधिसूचना –
file:///C:/Users/Online/Downloads/_var_www_nin.res.in_employment_Advt_No_333-12-04-2024.pdf

ICMR Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज भरताना आपली संपूर्ण आणि अचूक माहिती अर्जात भरावी.
तसेच अर्ज पाठवताना आवश्यक असल्यास योग्य कागदपत्रे जोडावीत.
उमेदवारांनी अर्ज अंतिम तारखेआधी पाठवणे अनिवार्य आहे. अर्ज उशिरा केल्यास तो ग्राह्य मानला जाणार नाही.
वरील पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही २४ एप्रिल २०२४ अशी आहे.

वरील भरती संदर्भात इच्छुक उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी राष्ट्रीय पोषण संस्थेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केलेली आहे.