डॉ. मिलिंद आपटे

● मी सध्या बीए तृतीय वर्षात शिकत आहे आणि २०२० ला १० वी ७० टक्क्यांनी आणि २०२२ मध्ये १२ वी ७० टक्क्यांनी कला शाखेतून उत्तीर्ण झालो. पदवीनंतर पुढे काय करू हे कळत नाही. एमपीएससी किंवा यूपीएससी करू हे समजत नाही आणि याची तयारी कशी करू हेही कळत नाही. याबद्दल मी मार्गदर्शन करावे. – विशाल कदम

बीएचे विषय कोणते त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे मोघम उत्तर द्यावे लागेल. बीएच्या पदवीनंतर एमए आवडत्या विषयात करणे नंतर शिक्षकी पेशा निवडणे हा एक ढोबळ मार्ग आहे अथवा सामाजिक संस्थांमध्ये रुची असल्यास अशा संस्थे सोबत काम करून करिअर घडवणे, सर्व स्पर्धा परीक्षांना तयारी करून बसणे, एमपीएससी यूपीएससीची आवड आणि तशी जिद्द असल्यास तो मार्ग आहेच, एमपीएससीचा अभ्यास कसा करावा. कशी सुरुवात करावी त्या बद्दल थोडक्यात माहिती देतोय –

सर्वात प्रथम राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे मन लावून वाचन करावे.

मागील कमीत कमी दहा वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे संकलन आणि वाचन. प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अध्ययन साहित्य जमवणे, अभ्यास नियोजन, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे.

बाजारात उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक साहित्यावर अवलंबून न राहता विषयांची संदर्भ पुस्तके वाचणे उत्तम. जसे विज्ञान, भूगोल या विषयांसाठी आठवी ते दहावीपर्यंतच्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वाचन प्रत्येकाने आपल्या वाचनाचा, पाठांतराचा वेग लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे. ठरावीक दर्जेदार पुस्तकांचीच उजळणी करणे उत्तम. सुरुवातीला प्रत्येक घटकाचे प्राथमिक वाचन करावे. मग द्वितीय वाचन शांतपणे करावे. यात न समजलेला भाग अधिक चांगल्या पद्धतीने वाचण्यावर भर द्यावा.

● माझी मुलगी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेतून यंदा दहावीची परीक्षा दिली. तिला पुढे कॉमर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे तर तिने पुढील शिक्षण कसे घ्यावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करावे. – विनोद रासम

कॉमर्स अकरावीला घेण्याआधी तिचे गणित कसे आहे त्याचा विचार होणे गरजेचे आहे. कारण गणित हा विषय असल्यास काही व्यावसायिक अभ्यासक्रम मिळतात. त्यामुळे गणित घेऊन पुढे सीए, सीएस, लॉ, आयपीएम, सीएफए असे व्यावसायिक अभ्यासक्रम निवडता येतात. अन्यथा ,बी कॉम , बीबीए , बीसीसीए, असे अभ्यास निवडता येतात. खूप शुभेच्छा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

careerloksatta@gmail.com