Chittaranjan Locomotive Works CLW Recruitment 2024 : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, पेंटररेफ या पदांच्या एकूण ४९२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. कंपनीने याबाबत नुकतीच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १८ एप्रिल २०२४ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवशयक आहे.
एकूण रिक्त पदं
४९२
पदाचे नाव
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
पदांचा तपशील
१) फिटर – २००
२) टर्नर – २०
३) मशीनिस्ट – ५६
४) वेल्डर (G&E) – ८८
५) इलेक्ट्रिशियन – ११२
६) रेफ. & AC – ०४
७) पेंटर – १२
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड दहावी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल.
वयाची अट:
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्ष आणि कमाल २४ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. यात एसी, एसटी उमेदवारांना पाच वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क – नाही.
अधिकृत वेबसाइट
https://clw.indianrailways.gov.in/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक
https://www.apprenticeshipindia.gov.in/