Digital Marketing Career: इंटरनेटच्या प्रगतीमुळे संपूर्ण जग बदलले आहे. सध्या हॉटेलमधून जेवण ऑर्डर करण्यापासून ते शिक्षण घेण्यापर्यंत सर्वकाही ऑनलाइन पद्धतीने सुरु आहे. करोना काळामध्ये याचे प्रमाण प्रचंड वाढले. सुरुवातीला फक्त संदेशवहनासाठी सुरु झालेल्या या सोयीचा वापर प्रत्येक गोष्टीमध्ये केला जात आहे. आपण एखादी वस्तू इंटरनेटवरुन ऑर्डर करतो किंवा ऑनलाइन खरेदी करतो; ती वस्तू आपल्यापर्यंत पोहचण्यासाठी मागे मोठी प्रक्रिया घडत असते. या डिजिटल विश्वामध्ये नवनवीन गोष्टींचा उदय होत आहे. करिअरच्या बाबतीमध्येही हे क्षेत्र आघाडीवर आहे. उत्तम वेतन आणि चांगल्या सुविधा मिळवण्याच्या हेतूने अनेक तरुण डिजिटल माध्यमांमध्ये काम करायला सुरुवात करत आहेत.

मार्केटिंग टूल्स आणि डिझायनिंग

सध्या मार्केटिंग या क्षेत्राला खूप महत्त्व आहे. उत्तम मार्केटिंग येत असल्यास कोणत्याही कंपनीमध्ये नोकरी मिळू शकते. ऑनलाइन मार्केटमधील ट्रिक्सच्या बळावर तुम्ही कंपनीचे उत्पादन विकण्यास मदत करु शकता. मार्केटिंगबरोबर डिझायनिंग देखील ऑनलाइन विश्वामध्ये फायदेशीर असते. एखाद्या गोष्टीची जाहिरात करण्यासाठी डिझायनिंगचा वापर केला जातो.

Alankrita Sakshi’s Success Story
Alankrita Sakshi : अलंकृतासारखे तुम्हीही Google मध्ये नोकरी मिळवू शकता; बीटेक, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम अन् या आयटी स्कीलच्या जोरावर मिळवले ६० लाखांचे पॅकेज
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Live in relationship
“लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या सज्ञान जोडप्यांना संरक्षण दिलं पाहिजे, मग ते विवाहित असले तरीही”, उच्च न्यायालयाचे निरीक्षण
tiss Bans students participation in anti establishment unpatriotic discussions
राजकीय चर्चा, आंदोलने यांत सहभागी होण्यास टीसच्या विद्यार्थ्यांना मनाई; ‘टीस’कडून विद्यार्थ्यांसाठीच्या नियमावलीमध्ये बदल
navi Mumbai potholes repairing works
नवी मुंबई: गणेशोत्सवापूर्वी खड्डेदुरुस्तीला वेग, ९५ टक्के खड्डेदुरुस्तीचा पालिकेचा दावा
Deepak Kesarkar, transfers Education Department,
शिक्षण विभागातील बदल्यांसाठी ‘रेट कार्ड’, शिक्षण मंत्री म्हणाले बदल्याच बंद तर…
Navi Mumbai, helpers municipal schools Navi Mumbai,
नवी मुंबई : महापालिका शाळांमध्ये मदतनीसांची कमतरता; सखी सावित्री समितीचा अहवाल देण्याचे निर्देश
Bhayandar, Shiv Sena Thackeray group, Clash Between Two Women Leaders, fight, viral video,
Video: भाईंदरमध्ये ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारी

अ‍ॅनालिटिक्स

गेल्या काही वर्षांमध्ये अ‍ॅनालिटिक्स या पदाचे महत्त्व वाढले आहे. अ‍ॅनालिटिक्स टूल, गुगल अ‍ॅनालिटिक्स अशा काही तंत्राचा वापर अ‍ॅनालिटिक्स करत असतात. यामधून कंपनीच्या ग्राहकाबाबतची माहिती मिळवता येते. त्यानुसार भूतकाळामध्ये केलेल्या चुका भविष्यात टाळण्याचा प्रयत्न करत नवे प्लॅन्स तयार केले जातात.

स्ट्रैटेजिक थिंकिंग

एखाद्या कंपनीची प्रगती होण्यासाठी त्या कंपनीमध्ये नियोजन असणे आवश्यक असते. कंपनी चालवण्यासाठी प्लॅन्सची गरज असते. मार्केटिंग प्लॅन तयार करण्यासाठी स्ट्रैटेजिक थिंकिंगची गरज असते. तुम्ही जर या क्षेत्रामध्ये पारंगत असाल, तर कोणत्याही कंपनीमध्ये तुम्हाला सहज नोकरी मिळेल.

कन्टेंट क्रिएशन

सोशल मीडियाच्या विकासामुळे कन्टेंट क्रिएशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. कन्टेंट क्रिएशनला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे मोठमोठ्या कंपन्या या क्षेत्रामध्ये प्रवेश करत आहेत. या माध्यमाद्वारे सेवा किंवा उत्पादनांची मार्केटिंग करणे सोपे आणि प्रभावी असल्यामुळे कन्टेंट क्रिएशनचे प्रमाण गेल्या काही काळापासून वाढले आहे.

डिजिटल मार्केटिंग चॅनल्स

डिजिटल क्षेत्रामध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, पे पर क्लिक अ‍ॅडव्हरटायझिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, ई मेल मार्केटिंग, कंटेन्ट मार्केटिंग अशा असंख्य क्षेत्रांमध्ये नोकऱ्या उपलब्ध आहेत. तुमच्याकडे डिजिटल विश्वाबद्दलचे अपडेटेड ज्ञान असले, तर तुम्हाला सहज चांगल्या पगाराची नोकरी मिळेल.