डॉ. संजीव विद्यार्थी
विचारपूर्वक विकसित केलेल्या जागा व यंत्रणांपासून अधिक औपचारिकपणे ‘डिझाइन केलेल्या’ उत्पादनांपर्यंत डिझाइन सुधारणांमुळे दैनंदिन जीवन खूप सोपे झाले आहे. आज, रेल्वे स्थानके स्वच्छ व अधिक सोयीस्कर आहेत, विमानतळे कार्यक्षमता व आकर्षकता यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकत्रितपणे, आपण डिझाइनचा काळजीपूर्वक वापर केला तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो.
आज, भारत अभूतपूर्वरित्या आणि वेगाने पुढे जात आहे, शहरी व ग्रामीण दोन्ही परिसंस्थांमध्ये सखोल भौतिक, सांस्कृतिक व आर्थिक परिवर्तन होत आहे. पण, यासह आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या आणि संदर्भात्मक आव्हानांचा सामना करावा लागत आहे, यामुळे भारताचा विकास सर्वांगीण व सर्वसमावेशक आहे याची खात्री करण्यासाठी काळजीपूर्वक डिझाइन केलेल्या उपायांची गरज आहे. या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी डिझाइन प्रबळ सक्षमकर्ता म्हणून उदयास आले आहे, ज्यामध्ये सर्वसमावेशक, प्रभावी व शाश्वत उपायांना आकार देण्याची क्षमता आहे.
डिझाइनमध्ये धोरणे व पद्धतींना आकार देण्याची परिवर्तनकारी क्षमता आहे आणि भारताच्या विकासगाथेमध्ये त्याचे वाढते प्रमाण आधीच दिसून येत आहे. विचारपूर्वक विकसित केलेल्या जागा व यंत्रणांपासून अधिक औपचारिकपणे ‘डिझाइन केलेल्या’ उत्पादनांपर्यंत डिझाइन सुधारणांमुळे दैनंदिन जीवन खूप सोपे झाले आहे. आज, रेल्वे स्थानके स्वच्छ व अधिक सोयीस्कर आहेत, विमानतळे कार्यक्षमता व आकर्षकता यांमध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अनेक आरोग्यसेवा यंत्रणा व्यापक पोहोचसाठी व रूग्णांना उत्तम निष्पती देण्यासाठी रुग्ण-केंद्रित दृष्टिकोन तयार करत आहेत. एकत्रितपणे, आपण डिझाइनचा काळजीपूर्वक वापर केला तर त्याचा खूप फायदा होऊ शकतो.
आपल्या आसपास उत्तमरित्या डिझाइन केलेल्या राहणीमानाचे वाढते प्रमाण पाहायला मिळत आहे. व्यक्ती फॅशनेबल असण्यासोबत हवामानाला अनुकूल व आरामदायी असलेल्या विविध पोशाखांना प्राधान्य देतात. नुकतेच डिझाइन हस्तक्षेपांनी सार्वजनिक परिवहन सर्वांसाठी अधिक सोयीस्कर केले आहे. अनेक शहरे ऊर्जा संवर्धन आणि कार्यक्षम कचरा व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानांचा अवलंब करत आहेत.
आपल्या आसपास उत्तमरित्या डिझाइन केलेले राहणीमान आपल्याला प्रेरित करत असले तरी ते अधिककरून समूहांमध्ये होते. विकसित भारताचे दीर्घकाळापासूनचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डिझाइनला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे, ज्यामुळ मोठ्या समाजावर व्यापक व अधिक अर्थपूर्ण प्रभाव पाडता येईल. यासंदर्भात डिझाइन शिक्षण महत्त्वाचे ठरते, कारण त्यामुळे भावी स्मार्ट नवप्रवर्तकांची पिढी घडते, जे समाजाच्या गरजा समजून घेण्यास आणि सर्वांना फायदा होईल असे सर्वसमावेशक व शाश्वत सोल्यूशन्स डिझाइन करण्यासाठी आवश्यक कौशल्यांसह सक्षम असतील.
विकसित भारताचा मार्ग फक्त आर्थिक गती प्राप्त करणे आणि ती टिकवून ठेवणे यापुरता मर्यादित नाही तर भारतीयांना अनुकूल असलेल्या सर्वसमावेशक आणि शाश्वत यंत्रणा डिझाइन करणे देखील महत्त्वाचे आहे. पुढे जात, भारताला स्मार्ट डिझाइनर्सच्या सक्षम पिढीची आवश्यकता आहे, जे भविष्याची कल्पना करू शकतील आणि व्यक्तींना व आपल्या पर्यावरणाला एकत्रितपणे सेवा देणाऱ्या नाविन्यपूर्ण उपायांद्वारे आकार देऊ शकतील.
दर्जेदार डिझाइन शिक्षण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्प्रेरक ठरू शकते. डिझाइन शिक्षण शहरी आणि ग्रामीण दोन्ही समुदायांच्या गरजा पूर्ण करून सर्वसमावेशक विकासास मदत करू शकते. विद्यार्थ्यांना सहानुभूती, संदर्भात्मक जागरूकता, शाश्वतता, तंत्रज्ञानाचा नैतिक वापर आणि आंतर-विद्याशाखीय सहयोग अशा साधनांसह सुसज्ज करून डिझाइन शिक्षण त्यांना सामाजिक-आर्थिक तफावत दूर करणाऱ्या नाविन्यता निर्माण करण्यास सक्षम करू शकते. शाश्वत गृहनिर्माण व ऊर्जा-कार्यक्षम शहरांपासून सहज उपलब्ध सार्वजनिक आरोग्य, अधिक डिजिटल साक्षरता आणि शाश्वत परिवहन उपायांपर्यंत डिझाइन-केंद्रित दृष्टिकोन वंचित व्यक्तींना सक्षम बनवू शकतात, तसेच समान विकासाला गती देऊ शकतात. सामाजिकदृष्ट्या जागरूक डिझाइनर्सच्या पिढीला निपुण करत भारत देशाच्या कानाकोपऱ्यात प्रगती घडून येईल, याची खात्री करू शकतो.
पण, विद्यापीठे व उच्च शैक्षणिक संस्थांनी पारंपरिक पद्धतींना दूर केले पाहिजे आणि डिझाइनचे कौशल्य म्हणून अध्यापन केले पाहिजे. डिझाइन आंतरविद्याशाखीय विषय आहे, ज्यामध्ये मानवता, व्यवसाय व विज्ञानाचा समावेश आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक सर्वांगीण पद्धतीने समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन पैलू व नवीन दृष्टिकोनाचा वापर करता येतो. उच्च शैक्षणिक संस्थांनी या दृष्टिकोनाला सक्रियपणे प्रेरित केले पाहिजे.
प्रभावी अध्ययनासाठी युनिव्हर्सिटींनी अनुभवात्मक अध्ययन, समुदाय सहभाग, उद्योग सहयोग, उद्योजकता आणि विद्यमान अभ्यासक्रमामध्ये इंडीजीनिअस नॉलेज सिस्टम्स (आयकेएस)च्या समावेशाला प्राधान्य दिले पाहिजे. आंतरविद्याशाखीय शिक्षण विविध क्षेत्रांकडे लक्ष वेधून घेते, विविध क्षेत्रांमध्ये सहयोगाला चालना देते आणि सर्जनशील उपायांचे प्रमाण वाढवते. समुदाय सहभाग खात्री देतो की, विद्यार्थी समुदायातील सदस्यांसोबत प्रत्यक्ष काम करतात, त्यांची आव्हाने समजून घेतात आणि व्यावहारिक उपाय डिझाइन करतात. उद्योजकता विद्यार्थ्यांना पारंपरिक रोजगारापलीकडे विचार करण्यास आणि नाविन्यपूर्ण व प्रभावी उद्यम निर्माण करण्यासाठी डिझाइन विचारसरणीचा फायदा घेण्यास, तसेच नोकरीसाधकावरून रोजगार निर्माते बनण्यास सक्षम करते.
विकसित भारत@२०४७ ध्येय संपादित करण्यासाठी विकासगाथेच्या प्रत्येक पावलावर डिझाइनचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. डिझाइनच्या माध्यमातून आपण सहयोगाने आनंदी भविष्य घडवू शकतो, ज्यामध्ये आपल्या समाजाच्या सर्व गरजा पूर्ण होतील, प्रत्येक प्रांत, समुदाय समूह व नागरिक या दीर्घकालीन राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेचा भाग बनतील.
(लेखक अनंत नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्रोव्होस्ट आहेत.)
