सुहास पाटील

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदौरमध्ये ५ वर्षे कालावधीचा ‘इंटिग्रेटेड प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट’ (आयपीएस) २०२४-२९ बॅचसाठी १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना प्रवेश. (असोसिएशन अॅडव्हान्स्ड कॉलेजिएट स्कूल्स ऑफ बिझनेस (एएसीएसबी) (USA); असोसिएशन ऑफ एमबीए ( MBA) ( UK) आणि युरोपिअन फाऊंडेशन फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ( EFMD), क्वालिटी इम्प्रूव्हमेंट सिस्टीम ( EQUIS), युरोप यांचेकडून मान्यताप्राप्त)

प्रवेश क्षमता – १५०.

पात्रता – १२ वीची परीक्षा किमान ६० टक्के गुणांसह २०२२, २०२३ मध्ये उत्तीर्ण (२०२४ ला १२ वी परीक्षेस बसणारे/३१ जुलै २०२४ पर्यंत पात्रता धारण करणारे) अर्ज करण्यास पात्र (अजा/अज/अपंग – ५५ टक्के गुण).

वयोमर्यादा – उमेदवारांचा जन्म दि. १ ऑगस्ट २००४ किंवा नंतरचा असावा. (अजा/अज/अपंग उमेदवारांचा जन्म दि. १ ऑगस्ट १९९९ किंवा नंतरचा असावा.)

आयआयएम इंदौरने भारतात प्रथमच असा प्रोग्रॅम २०११ पासून सुरू केला आहे. आयपीएमची पहिली बॅच मार्च २०१६ मध्ये बाहेर पडली आहे. हा प्रोग्रॅम ५ वर्षे कालावधीसाठी १५ टर्म्समध्ये विभागलेला आहे. (प्रत्येक वर्षी ३ महिन्यांच्या ३ टर्म्स). IPM दोन भागांत विभागलेला आहे. पहिला ३ वर्षे फाऊंडेशन आणि शेवटच्या दोन वर्षांत मॅनेजमेंट स्किल्स. इंटिग्रेटेड प्रोग्रॅम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ५ वर्षांच्या शेवटी उमेदवारांना बॅचलर ऑफ आर्ट्स (फाऊंडेशन ऑफ मॅनेजमेंट) आणि मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन ( MBA) या पदव्या आयआयएम, इंदौरकडून बहाल केल्या जातील.

पहिल्या ३ वर्षांमध्ये (फाऊंडेशन कोर्स) पुढील कोर्सेस दिले जातात. (१) मॅथेमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, ईकॉनॉमिक्स, (२) सायकॉलॉजी, सोशिऑलॉजी, पॉलिटिकल स्टडीज, (३) लँग्वेजेस (इंग्लिश, प्रेंच, स्पॅनिश, जर्मन), प्रेझेंटेशन स्किल्स, डान्स, ड्रामा, स्पोर्ट्स.

पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम लेव्हलवरील कोर्सेस – कम्युनिकेशन, ईकॉनॉमिक्स, फिनान्स अॅण्ड अकाऊंटींग, ह्युमॅनिटीज अॅण्ड सोशल सायन्सेस, इन्फॉरमेशन सिस्टिम्स, मार्केटिंग, ओ बी अॅण्ड एचआर, ऑपरेशन्स मॅनेजमेंट अॅण्ड क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, स्ट्रटेजी, रूरल इमर्शन प्रोग्राम, हिमालया आऊट बाँड प्रोग्रॅम, इंडस्ट्री विझिट वर्कशॉप व इतर ऑप्शनल वर्कशॉप्स.

कोर्स फी – १ ले वर्ष – ६,०४,७११/-; २ रे वर्ष – ५,५४,७११/-; ३ रे वर्ष – ५,५४,७११/-. टर्मनुसार ३ हप्त्यांमध्ये फी भरता येईल. चौथ्या व पाचव्या वर्षी कोर्स फी पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन मॅनेजमेंटसाठी असलेल्या फीप्रमाणे.

पहिल्या ३ वर्षांसाठी अकोमोडेशन शेअरिंग बेसिसवर, त्यानंतर सिंगल रुम अकोमोडेशन दिले जाईल. आयपीएम स्टुडंट्सना सोशल इंटर्नशीप दुसऱ्या वर्षाच्या शेवटी करावी लागेल. ४ थ्या व ५ व्या वर्षी दरम्यान PGP स्टुडंट्स सोबत बिझनेस इंटर्नशीप करावी लागेल.

आयपीएम स्टुडंट्ससाठी आयपीएम ४ थ्या वर्षाच्या शेवटी समर प्लेसमेंट आयोजित करत असते. प्रमुख रिक्रूटर्स, बँकिंग, फिनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्श्युरन्स, FMCG, Media & PR.

निवड पद्धती – ( i) प्रवेश परीक्षा ( Written Ability Test ( WAT)) – (अॅप्टिट्यूड, लॉजिकल, रिझनिंग आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व व मॅथेमॅटिक्स), ( ii) पर्सोनल इंटरह्यू ( PI)

ज्या उमेदवारांच्या कुटुंबाचे उत्पन्न रु. ९ लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना फिनान्शियल असिस्टन्स मिळू शकते. विस्तृत माहिती https:// www. iimidr. ac. in/ academic. programmes/ post- graduate. program. in. management/ need- based- financial- assistance- nbfa

प्रवेश परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन www. iimidr. ac. in या संकेतस्थळावर दि. २६ मार्च २०२४ पर्यंत करावेत. IPM अॅप्टिट्यूड टेस्ट (प्रवेश परीक्षा) दि. २३ मे २०२४ रोजी भारतातील मुंबई, पुणे, नागपूर इ. ३६ शहरांत घेतली जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शंकासमाधानासाठी फोन नं. ०७३१-२४३९६८६/६८७, ९१ ९५१३६३२७११. ई-मेल ipmadmission@iimidr. ac. in