इंडियन आर्मीमध्ये अविवाहित पुरुष व महिला लॉ ग्रॅज्युएट्सना शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन ‘जज अ‍ॅडव्होकेट जनरल ब्रँच’ (JAG Entry Scheme ts nd Course (April 2024)) साठी प्रवेश. रिक्त पदे – पुरुष – ५, महिला – २.

पात्रता : एलएल.बी. पदवी किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि  CLAT PG-2023 स्कोअर सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे. (LL.M. उत्तीर्ण आणि LL.M. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनासुद्धा) बार काऊंसिलकडे रजिस्ट्रेशन करण्यास पात्र असावा.

वयोमर्यादा : दि. १ जानेवारी २०२४ रोजी २१ ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९७ ते १ जानेवारी २००३ दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती : शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारा परीक्षा केंद्र अलॉटमेंट कळविली जाईल.

SSB निवड केंद्र : अलाहाबाद, भोपाळ, बंगळूरु आणि कापूरथाला. त्यानंतर उमेदवारांनी इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर लॉगइन करून एसएसबीची तारीख (प्रथम येणाऱ्यास प्रथम पसंती) निवडावयाची आहे. एसएसबी इंटरव्ह्यूचे स्टेज-१ उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना स्टेज-२ साठी पाठविले जाईल. एसएसबी इंटरव्ह्यूचा कालावधी ५ दिवसांचा असेल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाईल.

कार्यकाळ : शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन १४ वर्षांसाठी असेल. सुरुवातीला १० वर्षे जो आणखीन ४ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. १० वर्षांच्या कमिशननंतर ऑफिसर्सना परमनंट कमिशन मिळविता येईल. कार्यकाळ संपल्यावर किंवा संपण्यापूर्वी कार्यमुक्त झालेल्या उमेदवारांना ऐच्छिक तत्त्वावर ५ अधिक २ वर्षे (महिला – ३७ वर्षेपर्यंत, पुरुष – ४० वर्षेपर्यंत जे अगोदर घडेल त्याप्रमाणे) आर्मीची सेवा करण्याची संधी दिली जाईल.

ट्रेनिंग : निवडलेल्या उमेदवारांना ४९ आठवडय़ांचे प्री-कमिशिनग ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग अ‍ॅकॅडमी (OTA) चेन्नई येथे दिले जाईल. प्री-कमिशिनग ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड स्टट्रेजिक स्टडीज’ हा डिप्लोमा मद्रास विद्यापीठाकडून दिला जाईल. अर्ज केल्याच्या दिनांकानंतर लग्न केलेले उमेदवार निवड झाली असले तरी ते ट्रेनिंगसाठी अपात्र ठरतील. ट्रेनिंग दरम्यान लग्न केल्यास उमेदवारांना परत पाठविले जाईल. जेंटलमेन आणि लेडी कॅडेट्सना ट्रेनिंग दरम्यान रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंडि दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यानच्या देय भत्त्यांची थकबाकी कॅडेट्सना ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.

प्रबोशन : निवडलेले उमेदवार ६ महिन्यांच्या प्रोबेशनवर असतील. उमेदवारांना १ कोटी रुपयांचा विमा संरक्षण असेल.

प्रमोशन : ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना लेफ्टनंट पदावर कमिशन दिले जाईल. त्यानंतर २ वर्षांनी कॅप्टन पदावर, ६ वर्षांच्या सेवा काळानंतर मेजर पदावर पदोन्नती दिली जाईल.

वेतन : दरमहा रु. ५६,१००/- (पे-लेव्हल – १०) + रु. १५,५००/- मिलिटरी सव्‍‌र्हिस पे इतर भत्ते. अंदाजे रु. १.०५ लाख.

ऑनलाइन अर्ज  http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर दि. २१ जुलै २०२३ (१५.०० वाजे) पर्यंत करावेत. ((Officer Entry Appln/ Login;  Registration;  Apply Online;  Officers Selection;  Eligibility;  Apply Short Service Commission JAG Entry Course)

शंकासमाधानासाठी  http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ‘Feedback/ Queries’ ऑप्शन उपलब्ध आहे.                        

केंद्र सरकारमध्ये किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांना हिंदी/ इंग्रजीसोबत मराठी माध्यमातून परीक्षा देऊन नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी या कालच्या लेखातील हवालदार पदांसाठी CBIC CCAsCGST च्या टेरिटोलियल ज्युरिस्डिक्शन कोड नंबर आणि हवालदारची रिक्त पदे यांचा तपशील व उर्वरित मजकूर .

(१) मुंबई CGST अंतर्गत येणारे जिल्हे – मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड (महाराष्ट्रातील पुणे CGST आणि नागपूर CGST कमिशनरेट वगळता इतर CGST कमशिनरेट्स) (कोड नं. ४७) – २५ पदे.

(२) पुणे CGST अंतर्गत येणारे जिल्हे – पुणे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर (महाराष्ट्रातील पुणे CGST अंतर्गत येणारी कमिशनरेट्स) (कोड नं. ४९) – ४ पदे.

(३) नागपूर CGST अंतर्गत येणारे जिल्हे – नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलाढाणा, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि बीड (महाराष्ट्रातील नागपूर CGST अंतर्गत येणारी कमिशनरेट्स) (कोड नं. ४८) – ० पदे.

(४) वडोदरा CGST (गुजरात, दादरा नगर हवेली, दमण आणि दिव) (कोड नं. ५०) – १२७ पदे.

(५) गोवा CGST (गोवा राज्यातील CCA) (कोड नं. ४६) – ० पदे.

(६) गोवा कस्टम्स (अंतर्गत येणारी कस्टम्स कमिशनरेट्स) (कोड नं. ५१) – ० पदे.

(७) मुंबई कस्टम्स (महाराष्ट्र राज्यातील नागपूर CGST CCA वगळता कोड नंबर ५२) – १६ पदे.

(८) CBN डायरेक्टोरेट (मुख्यालय ग्वालियर, नीमच (मध्य प्रदेश), लखनौ (यू.पी.) कोटा (राजस्थान) येथील ब्रँच ऑफिसेस) (कोड नं. ७०) – २३ पदे.

(९) डायरेक्टोरेट जनरल ऑफ परफॉरमन्स मॅनेजमेंट (DGPM)) (सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश) (कोड नं. ७१) – ३२ पदे.

(१०) CGST लखनऊ (उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड) (CCA st) – १० पदे.

MTS पदांसाठी राज्य निहाय कोड नंबर : MTS Maharashtra (कोड नंबर ५६) – ५६ पदे (१८-२५ वर्षे वयोगट); ८ पदे (१८-२७ वर्षे वयोगट); MTS Goa (कोड नंबर ५४) – १ पद (१८-२५ वर्षे); MTS Gujarat (कोड नंबर ५५) – १० पदे (१८-२५ वर्षे); MTS Andhrapradesh (कोड नंबर ६१) – २३ पदे (२८-२५ वर्षे); १२ (१८-२७ वर्षे); MTS Telangana (कोड नंबर ६३) – ८८ पदे (१८-२५ वर्षे वयोगट); MTS Karnataka (कोड नंबर ६७) – ४७ पदे (१८-२५ वर्षे वयोगट); ५ पदे (१८-२७ वर्षे);  MTS all India (कोड नंबर ७२).