सुहास पाटील

इंडियन आर्मीमध्ये अविवाहित पुरुष व अविवाहित महिला लॉ ग्रॅज्युएट्सना शॉर्ट सर्व्हिस कमिशन जज अॅडव्होकेट जनरल ब्रँच ’ (JAG Entry Scheme 33 rd Course (October 2024)) साठी प्रवेश. रिक्त पदे – पुरुष – ४, महिला – ४.

पात्रता : एलएल.बी. पदवी किमान सरासरी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि CLAT PG-2023 स्कोअर सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य आहे (LL.M. उत्तीर्ण आणि LL.M. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांनासुद्धा). बार काऊंसिलकडे रजिस्ट्रेशन करण्यास पात्र असावा.

वयोमर्यादा : दि. १ जुलै २०२४ रोजी २१ ते २७ वर्षे. (उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९७ ते १ जुलै २००३ दरम्यानचा असावा.)

निवड पद्धती : शॉर्ट लिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेल द्वारा परीक्षा केंद्र अलॉटमेंट कळविली जाईल.

SSB निवड केंद्र : अलाहाबाद, भोपाळ, बंगलोर आणि जालंदर. त्यानंतर उमेदवारांनी इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर लॉगइन करून एसएसबीची तारीख (प्रथम येणाऱ्यास प्रथम पसंती) निवडावयाची आहे. एसएसबी इंटरह्यूचे स्टेज-१ उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना स्टेज-२ साठी पाठविले जाईल. एसएसबी इंटरह्यूचा कालावधी ५ दिवसांचा असेल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची वैद्याकीय तपासणी केली जाईल.

हेही वाचा >>> एमपीएससी मंत्र : वनसेवा मुख्य परीक्षा पेपर-२ – मृदा घटक

कार्यकाळ : शॉर्ट सर्व्हिस कमिशन १४ वर्षांसाठी असेल. सुरुवातीला १० वर्षे जो आणखीन ४ वर्षांनी वाढविला जाऊ शकतो. १० वर्षांच्या कमिशननंतर ऑफिसर्सना परमनंट कमिशन मिळविता येईल. कार्यकाळ संपल्यावर किंवा संपण्यापूर्वी कार्यमुक्त झालेल्या उमेदवारांना ऐच्छिक तत्त्वावर ५ अधिक २ वर्षे (महिला – ३७ वर्षेपर्यंत, पुरुष – ४० वर्षेपर्यंत जे अगोदर घडेल त्याप्रमाणे) आर्मीची सेवा करण्याची संधी दिली जाईल.

ट्रेनिंग : निवडलेल्या उमेदवारांना ४९ आठवड्यांचे प्री-कमिशनिंग ट्रेनिंग ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (OTA) चेन्नई येथे दिले जाईल. प्री-कमिशनिंग ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिफेन्स मॅनेजमेंट अॅण्ड स्ट्रटेजिक स्टडीज’ हा डिप्लोमा मद्रास विद्यापीठाकडून दिला जाईल. अर्ज केल्याच्या दिनांकानंतर लग्न केलेले उमेदवार निवड झाली असले तरी ते ट्रेनिंगसाठी अपात्र ठरतील. ट्रेनिंग दरम्यान लग्न केल्यास उमेदवारांना परत पाठविले जाईल. जेंटलमेन आणि लेडी कॅडेटसना ट्रेनिंग दरम्यान रु. ५६,१००/- दरमहा स्टायपेंडही दिले जाईल. ट्रेनिंग दरम्यानच्या देय भत्त्यांची थकबाकी कॅडेटसना ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर दिली जाईल.

प्रबोशन : निवडलेले उमेदवार ६ महिन्यांच्या प्रोबेशनवर असतील. उमेदवारांना १ कोटी रुपयांचा विमा संरक्षण असेल.

प्रमोशन : ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना लेफ्टनंट पदावर कमिशन दिले जाईल. त्यानंतर २ वर्षांनी कॅप्टन पदावर, ६ वर्षांच्या सेवा काळानंतर मेजर पदावर पदोन्नती दिली जाईल.

वेतन : दरमहा रु. ५६,१००/- (पे-लेव्हल – १०) रु. १५,५००/- मिलिटरी सर्व्हिस पे इतर भत्ते. अंदाजे रु. १.१५ लाख.

ऑनलाइन अर्ज www. joinindianarmy. nic. in या संकेतस्थळावर दि. २८ नोव्हेंबर २०२३ (१५.०० वाजे) पर्यंत करावेत. (Officer Entry Appln/ Login; Registration; Apply Online; Officers Selection; Eligibility; Apply Short Service Commission JAG Entry Course)

शंकासमाधानासाठी http://www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर ‘Feedback/ Queries’ ऑप्शन उपलब्ध आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन मर्यादित (MMRCL) (भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचा संयुक्त उपक्रम) ( Advt. No. MAHA- Metro/ P/ HR/ AA/ 2023 dt. २७.१०.२०२३) MMRCL मध्ये नागपूर , पुणे आणि नवी मुंबई येथे अॅप्रेंटिस अॅक्ट , १९६१ अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती. एकूण रिक्त जागा – १३४. ट्रेडनुसार शिकाऊ उमेदवारांसाठी विभागनिहाय रिक्त पदांचा तपशील –

(१) इलेक्ट्रिशियन : नागपूर – २४ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १२) (२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पुणे – १८ (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – १०) (१ पद माजी सैनिकासाठी राखीव). नवी मुंबई – ३ (खुला).

(२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : नागपूर – १७ (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ९) (१ पद माजी सैनिकासाठी राखीव). पुणे – १३ (अजा – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८) (१ पद माजी सैनिकासाठी राखीव). नवी मुंबई – २ (खुला).

(३) फिटर : नागपूर – २५ (अजा – ३, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – १३) (२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव). पुणे – १७ (अजा – २, अज – १, इमाव – ४, ईडब्ल्यूएस – १, खुला – ९) (१ पद माजी सैनिकासाठी राखीव). नवी मुंबई – २ (खुला).

(४) लिफ्ट व एक्सलेटर मेकॅनिक : नागपूर – ३ (खुला). पुणे – ३ (खुला). नवी मुंबई – १ (खुला).

(५) मेकॅनिक (फ्रिज व ए/सी) : नागपूर – २ (खुला). पुणे – २ (खुला). नवी मुंबई – १ (खुला).

नागपूर, पुणे विभागातील सर्व पदे मिळून दिव्यांग उमेदवारांसाठी प्रत्येकी १ पद कॅटेगरी OH आणि HH साठी राखीव.

पात्रता : (i) १० वी परीक्षा किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (ii) नॅशनल काऊन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/ स्टेट काऊन्सिल फॉर व्होकेशनलने जारी केलेले नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट.

वयोमर्यादा : (दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी) १७ वर्षे पूर्ण आणि २४ वर्षांपेक्षा कमी कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे.

अजा/ अज/ ईडब्ल्यूएस उमेदवारांनी सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करतेवेळी अपलोड करणे आवश्यक.

इमाव उमेदवारांनी योग्य प्राधिकाऱ्याने दि. १ एप्रिल २०२३ किंवा त्यानंतर जारी केलेले प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमी लेयर प्रमाणपत्र ऑनलाइन अर्ज करतेवेळी अपलोड करणे आवश्यक.

अर्ज फी : रु. १००/- आणि प्रक्रिया शुल्क रु. ५०/-, एकूण रु. १५०/-. (अजा/ अज/ दिव्यांग/ महिला उमेदवारांना अर्ज शुल्क माफ आहे. परंतु त्यांना रु. ५०/- प्रक्रिया शुल्क भरावे लागेल.)

निवड पद्धती : प्राप्त झालेल्या अर्जांमधून पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीमध्ये १० वी मधील गुणांची टक्केवारी आणि आयटीआय ट्रेड ज्यामध्ये अॅप्रेंटिसशिप करावयाची आहे, त्यामधील एकूण गुणांचा समावेश असेल. १० टक्के उमेदवारांची प्रतीक्षायादी बनविली जाईल. उमेदवारांनी नागपूर, पुणे किंवा नवी मुंबई यापैकी एकच युनिट निवडायचे आहे.

ऑनलाइन अर्ज www. mahametro. org या संकेतस्थळावर दि. २८ नोव्हेंबर २०२३ (१८.०० वाजे) पर्यंत करावेत. (ACT APPRENTICE NOTIFICATION ह्या लिंकवर क्लिक करा.)

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम) Advt. No. CC/09/2023 dt. 11.10.2023. ऑफिसर ट्रेनी (लॉ) पदांची CLAT-2024 (for admission to Post Graduation) स्कोअर आधारित भरती. एकूण रिक्त पदे – १०. पदाचे नाव – ऑफिसर ट्रेनी (लॉ). एकूण – १० पदे (अजा – १, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ५) (१ पद दिव्यांग कॅटेगरी VI साठी राखीव).

पात्रता : कायदा विषयातील पदवी आणि CLAT-2024 (for admission to Post Graduation)

पदवी गुणपत्रिकेत CGPA/ OGPA/ DGPA मध्ये दर्शविलेले गुणांचे विद्यापीठाच्या नियमानुसार समतूल्य टक्केवारीमध्ये रूपांतर करणे अनिवार्य आहे.

वयोमर्यादा : (दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी) २८ वर्षे. (उमेदवाराचा जन्म दि. २९ नोव्हेंबर १९९६ ते २९ नोव्हेंबर २००५ दरम्यान झालेला असावा.)

वयोमर्यादेत सूट : इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.

निवड पद्धती : CLAT-2024 (for admission to Post Graduation) परीक्षेतील गुण, वर्तनात्मक मूल्यांकन (behavioral assessment), ग्रुप डिस्कशन आणि पर्सोनल इंटरह्यू यांचा समावेश असेल. CLAT-2024 (for admission to Post Graduation) परीक्षेतील स्कोअरनुसार पात्र उमेदवार पुढील भरती प्रक्रियेसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. त्यांना पॉवरग्रिडच्या वेबसाईटवर इंटरह्यूसाठीचे कॉल लेटर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदवारांना ते candidates login मधून डाऊनलोड करता येईल.

पर्सोनल इंटरव्ह्यूमध्ये पात्रतेसाठी किमान गुण खुला/ ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी ४० टक्के, इतर राखीव पदांसाठी ३० टक्के. ग्रुप डिस्कशनसाठी किमान पात्रतेचे गुण नसतील.

CLAT-2024 (for admission to Post Graduation) मधील गुणांसाठी ८५ टक्के वेटेज, ग्रुप डिस्कशनसाठी ३ टक्के आणि पर्सोनल इंटरह्यूसाठी १२ टक्के वेटेज देऊन अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल.

उमेदवारांना CLAT-2024 (for admission to Post Graduation) साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन CLAT-2024 (consortiumofnlus.se.in) या संकेतस्थळावर दि. ३ नोव्हेंबर २०२३ पर्यंत करावेत.

वेतन : एक वर्षाच्या ट्रेनिंग दरम्यान ट्रेनीजना रु. ४०,०००/- मूळ वेतनावर १२ टक्के भत्ता, कऊअ, फअ दिला जाईल. ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर ट्रेनीजना ऑफिसर लॉ Es स्केल रु. ५०,००० – ३ टक्के – १,६०,००० IDA वर कायम केले जाईल. रु. ५०,०००/- मूळ वेतनावर IDA, HRA (किंवा अकोमोडेशन), परफॉर्मन्स रिलेटेड अलाऊन्स आणि इतर देय भत्ते दिले जातील.

अर्जाचे शुल्क : रु. ५००/- पॉवरग्रिडच्या वेबसाईटवरील लिंकवर क्लिक करून भरावेत. (https://www.powergrid.in/online-payment-application fees) (अजा/अज/दिव्यांग/ माजी सैनिक यांना फी माफ आहे.) ऑनलाइन अर्ज https://www.powergrid.in या वेबसाईटवरील लिंकवर क्लिक करून दि. ९ ते २९ नोव्हेंबर २०२३ (२३.५९ वाजे) पर्यंत करावेत. शंकासमाधानासाठी सब्जेक्टमध्ये recruitment@powergrid.in with
‘OT ( Law)’; in the subjectline असे नमूद करून मेल करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.