राज्य शासनाच्या कृषी विभागाकडूनलघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक या पदांसाठीच्या रिक्त जागा भरण्यासाठीची नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवरांना या भरतीसाठी http://www.krishi.maharashtra.gov.in या बेवसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तर या भरती अंतर्गत एकूण २१८ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि महत्वाच्या तारखा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागातील भरती २०२३ –
पदाचे नाव –
लघुटंकलेखक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक.
एकूण रिक्त पदे – २१८
वयोमर्यादा –
- खुल्या प्रवर्गासाठी -१८ ते ४० वर्षे.
- मागासवर्गीय प्रवर्गासाठी – १८ ते ४५ वर्षे.
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.
महत्वाच्या तारखा –
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख – १३ जुलै २०२३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जुलै २०२३
शैक्षणिक पात्रता –
लघुलेखक – १० वी पास/शॉर्ट हँड ८० WPM आणि इंग्रजी टायपिंग ४० WPM किंवा मराठी टायपिंग ३० WPM.
लघुलेखक (उच्च श्रेणी) – १० वी पास/शॉर्ट हँड १२० WPM आणि इंग्रजी टायपिंग ४० WPM किंवा मराठी टायपिंग ३० WPM
स्टेनोग्राफर – १० वी पास/शॉर्ट हँड १०० WPM आणि इंग्रजी टायपिंग ४० WPM. किंवा मराठी टायपिंग ३० WPM
वरिष्ठ लिपिक – किमान द्वितीय श्रेणी पदवी
सहाय्यक अधीक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी.
भरती प्रक्रिया – मुलाखतीद्वारे.
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग – ७५० रुपये.
अधिकृत बेवसाईट – http://krishi.maharashtra.gov.in/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी http://krishi.maharashtra.gov.in/ या अधिकृत बेवसाईटवरील भरतीची जाहिरात अवश्य पाहा.