केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत ग्रुप-सी व ग्रुप-बी (अराजपत्रित) पदांवर भरती होण्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची तयारी करून प्रतिष्ठित/सन्माननीय पदांवर भरती व्हा.

वयोमर्यादेत सूट – सर्व पदांसाठी इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षे.

Delhi High Court whatsapp hearing
व्हॉट्सॲप बंद होणार? केंद्र सरकारच्या मागणीचा विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
former director of agricultural produce market committee arrested in toilet scam
कृषी उत्पन्न बाजार समिती : शौचालय घोटाळा, एक माजी संचालक  अटक तर दुसऱ्याची चौकशी, एपीएमसीत खळबळ 
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!

(वयोमर्यादा – ग्रुप-सीच्या पदांसाठी विधवा/ परित्यक्ता महिलांसाठी – ३५ वर्षे/३८ वर्षे/४० वर्षे. (कॉन्स्टेबल (एक्झिक्युटिव्ह) पदांसाठी वयोमर्यादेत सूट ५ वर्षे))

वरील परीक्षांतून (हिंदी ट्रान्सलेटर पदे वगळता) सर्व पदांसाठी दरवर्षी हजारो जागा भरल्या जातात. (CGL२०२२ मधून भरली गेलेली पदे – ३६,००१)

पदवी उत्तीर्ण उमेदवार १० वी/१२ वी/पदवी पात्रतेचे निकष असलेल्या सर्व पदांसाठी पात्र आहेत.

सर्व परीक्षांसाठी साधारणत सारखाच अभ्यासक्रम आहे. फरक आहे तो काठिण्य पातळीचा.

उमेदवारांनी आपला पाया भक्कम करून (१० वीपर्यंत अभ्यासलेला शिक्षणक्रम मजबूत बनवावा.) नंतर ज्या परीक्षेसाठी पात्र आहेत त्या परीक्षांचा अभ्यासक्रम पाहून, प्रश्नपत्रिका सोडविण्याचा सराव करावा. विस्तृत माहिती स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या  www. ssc. nic. In वर उपलब्ध आहे.

पुढील वाक्ये कायम ध्यानात ठेवा. (१)  Practice Makes Man Perfect आणि (२)  Perseverance Beats Genius. (एखाद्याच्या अंगात भले हुशारी कमी असेल, पण चिकाटी (त्याची पाठपुरावा करण्याची क्षमता) असेल तर तो आयुष्यात यशस्वी होवू शकतो.)